आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय शिक्षण घेत होते, मात्र रक्त पाहिले की घाबरून जायचे; थोर व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीत द इंडिया मार्च फॉर सायन्स ऑर्गनायझिंग कमिटी आणि द ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीने १२ तेे १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘डार्विन वीक’ चे आयोजन केले आहे. ज्यात देशभरातून आलेले शास्त्रज्ञ भाग घेत आहेत. डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्यूशनवरील लोकांचा संशय दूर करणे हा त्यामागचा हेतू आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १८०९ रोजी श्रूजबरी, इंग्लंडच्या एका श्रीमंत कुटुंबात झाला. ६ बहीण-भावात ते पाचवे अपत्य होते. दादाजी, इरैजमस डार्विन, फिजीशियनसोबत एक चांगले शास्त्रज्ञही होते. वडील रॉबर्ट डार्विन फिजीशियन होते. याच पेशात त्यांनी अमाप पैसा कमावला होता. आई सुजैना वेजवूड साधारण कुटुंबातील होत्या. चार्ल्स केवळ ८ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी एलिमेंट्री शाळेत जायला सुरुवात केली. ९ व्या वर्षी त्यांनी श्रूजबेरी शाळेत प्रवेश घेतला. ते वसतिगृहात राहू लागले. फक्त महत्त्वाच्या क्षणीच घरी यायचे.

 

शाळेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. खासकरून भाषेत अतिशय कच्चे होते. ते पुस्तकांची पारायणे करून परीक्षा द्यायचे. खूप लांबवर चालणे त्यांना अतिशय आवडायचे. चालताना रस्त्यात पडलेल्या काही वस्तू उचलून खिशात ठेवायचे. त्यांना या वस्तू जमवण्याचा जणू छंदच जडला होता. त्यामुळे त्यांचे वडील खूप नाराज झाले. छोट्या डार्विन यांना विज्ञानात रस होता. भावाने घराच्या बगिच्यात रसायनशास्त्राची प्रयोगशाळा बनवली होती. चार्ल्स रात्री उशिरापर्यंत भावाला प्रयोगासाठी मदत करायचे. रसायनशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता. मात्र तो त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता. चार्ल्सवर शाळेचे मुख्याध्यापक रसायनशास्त्रात वेळ वाया घालवल्याबद्दल रागवायचे.


१६ व्या वर्षी चार्ल्स युनिव्हर्सिटी ऑफ एडिन्बर्गमध्ये मेडिकलचे विद्यार्थी होते. मानवी शरीराची चिरफाड करणे त्यांना मंजूर नव्हते. शस्त्रक्रियेदरम्यान उभे राहणे हे त्यांना भीतिदायक वाटायचे. रुग्णालयाच्या वार्डपर्यंतही जायची त्यांना भीती वाटायची. लेक्चर ऐकणेही त्यांना कंटाळवाणे वाटायचे. खरे तर त्यांना माहीत होते की, आपल्या पित्याजवळ अमाप पैसा आहे. त्यामुळे परीक्षेत पास होण्याचे काही बंधन नव्हते. चार्ल्स यांना प्राणीशास्त्रातही रस होता. मात्र जिओलॉजीचेे लेक्चर त्यांना कंटाळवाणे वाटायचे. निराश होऊन वडिलांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण थांबवले. एडिन्बर्गमधून चार्ल्स यांना काढून केंब्रिज विद्यापीठात पाठवले. तेथे त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. केंब्रिजमध्ये त्यांनी वनस्पती आणि प्राणीशास्त्राचा प्रचंड अभ्यास केला. बीटलच्या स्पेसीज एकत्र करण्यात त्यांना खूप रस होता. त्यांनी िजओलॉजीतही रस दाखवायला सुरुवात केली. श्रूजबरीत घरांच्या जवळील दगड ते बारकाइने न्याहाळू लागले. १८३१ मध्ये त्यांनी डिग्री घेतली. तेव्हा ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या सर्वे शिप, एचएमएस बिगलवर त्यांना नॅच्युरलिस्टची पोस्ट देण्यात आली. बिगल साउथ सी कडे मोठ्या अभियानावर निघणार होते. ही सुवर्णसंधी डार्विन यांना वाया घालवायची नव्हती. वडिलांना विचारले, मात्र सुरुवातीला ते कचरले. नंतर त्यांना पाठवायला राजी झाले. यात्रा पाच वर्षात पूर्ण होणार होती. अखेर एकदाचे अभियान सुरू झाले. प्रत्येक नव्या जागेवर डार्विन आपली मते नोंदवायचे. लिहायचे. प्रत्येक ठिकाणांहून ते दगड, फूल आणि इतर वस्तू एकत्र करायचे. गॅलापगोस बेटावर त्यांना विचित्र प्रकारचे जीव आढळले. ते रात्री उशिरापर्यंत लिखाण करायचे. ऑक्टोबर १८३६ मध्ये डार्विनची यात्रा समाप्त झाली. यात्रेवर जाण्याआधी ते पदवीधर होते. मात्र आता ते एक प्रख्यात शास्त्रज्ञ बनले होते. त्यांनी खूप सारे जीव एकत्र केले होते. ते इतर शास्त्रज्ञांना पाहायचे होते.


आता लोक डार्विन यांच्या कामाला ओळखत होते. ब्रिटीश सरकारने त्यांना आपले अनुभव लिहिण्याचा सल्ला दिला.  यात्रेदरम्यान डार्विन यांनी पक्षांच्या स्पेसिमनशिवाय १२ नवे फिंच जीवही शोधले. १८४५ मध्ये त्यांनी एका जीवाचे कसे अनेक जीव होतात ते लिहिले. डार्विन महत्त्वाकांशी नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली िथअरी कधीच प्रकाशित केली नाही. १८५८ मध्ये डार्विन यांना एल्फ्रेड वॉलेस यांच्या थिअरी ऑफ इव्हॉल्यूशनबद्दल कळले. त्यांना या थिअरीवर आधी काम केले होते. तेव्हा त्यांच्या मित्रांनी ठरवले की ही थिअरी वॉलेस आणि डार्विन या दोघांच्याही नावाने प्रसिद्ध करायची. १८५९ मध्ये डार्विन यांनी लिहिलेले ‘द ओरिजिन ऑफ स्पेसिज’ हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित झाले. ते इतके लोकप्रिय झाले की १२५० प्रती लगेच विकल्या गेल्या. डार्विन यांनी या पुस्तकात अनेक वर्षापर्यंत सुधारणा केल्या. १८६८ मध्ये त्यांनी ‘द व्हेरिएशन ऑफ अॅनिमल्स अँड प्लँट्स अंडर डोमेस्टिकेशन’ लिहिले.  १८७१ मध्ये ‘द डिसेंट ऑफ मॅन' मध्ये पुरावे दिले की पशूपण  मानवाचेच पूर्वज आहेत.

 

नाव: चार्ल्स रॉबर्ट डार्विन
जन्म: 1809
निधन: 1882
काम: शास्त्रज्ञ

 

>  लहान होते तेव्हा वाटेवर चालताना आढळणाऱ्या गोष्टी  उचलून खिशात ठेवायचे.
>  ‘माउंट डार्विन' माउंटेन यांच्याच नावावर आहे. 
> चर्चमध्ये जात नव्हते मात्र देवावर पूर्ण विश्वास होता.

बातम्या आणखी आहेत...