आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत: योग फिल्टर अाहे, प्रदूषणाचे शरीरावरील परिणाम 90%पर्यंत घटवू शकतो : बाबा रामदेव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आज चौथा आंतरराष्ट्रीय योगदिन आहे. भारतासह जगभरातील २०० देशांत तो साजरा होत आहे. मुख्य कार्यक्रम डेहराडूनमध्ये असून तेथे पंतप्रधान सुमारे ५५ हजार लोकांसोबत योगासने करतील. आयुष मंत्रालय योग लोकेटर अॅपही लाँच करणार आहे. योगदिनी योगाचे फायदे व इतर प्रश्नांवर अमन नम्र यांनी बाबा रामदेव यांच्याशी संवाद साधला. चर्चा अशी रंगली...


योगाचे सिद्धांत कधीही बदलणार नाहीत, व्यवहारात बदल मात्र होत राहतील...
योगातील नियम हे सार्वभौमिक आहेत, ते कधीही बदलणार नाहीत. योगाच्या मूळ सिद्धांतांत आजही कोणताही बदल झालेला नाही. मात्र योगाचा व्यवहार व क्रियांत बदल झाला आहे. वेळ आणि गरजेनुसार त्यातही नवकल्पना आल्या पाहिजेत.


>सर्वसामान्यांसाठी योगाचे काय महत्त्व आहे? योग न करणारी व्यक्ती काय गमावते?
- प्रत्येक शारीरिक कसरत चांगलीच आहे. पण त्याहून शंभरपट फायदा योगासनांमुळे होतो. योग अारोग्य व व्यक्तिमत्त्व विकासासह व्यसने, दु:खांपासून मुक्त यशस्वी व सुखी आयुष्य देते. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी हे गरजेचे आहे. योग न करणारी व्यक्ती सुदृढ व तणावमुक्त राहू शकत नाही. संघर्षामुळे ती दु:खी व निराश होईल. आत्महत्याही करू शकते. 


>अवघ्या देशातील लोक योगासने करू लागली तर काय होईल?
- १० लाख कोटी रुपये वाचतील, जे औषधे, व्हिटॅमिन, पॉवर ड्रिंक्सवर खर्च हाेतात. लोक चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखूपासून दूर राहतील. योगामुळे देशाच्या जीडीपीत १० पटीपर्यंत वाढ शक्य आहे. हेल्थ व वेल्थही वाढेल. सकारात्मक व अहिंसात्मक समृद्धी असलेली जीडीपी वाढेल. ही समृद्धी स्थायी असेल. आपण संस्कारवान महान देशाची निर्मिती करू शकू. 

 

>योग हा औषधांना समर्थ पर्याय आहे का?
- औषधांचा सर्वात मोठा, वैज्ञानिक व यशस्वी पर्याय आहे योग. अथर्ववेदानुसार प्राण हे सर्वात मोठे औषध आहे. हे वैश्विक औषध मानले गेले आहे. याेगविद्या ही औषधविद्याही आहे. हे अद्वितीय वैद्यकीय विज्ञान आहे. योग हा योग्य पद्धत, योग्य वेळेचे भान राखून केल्यास साइड इफेक्टही होणार नाही.


>समजा एखाद्याचा रक्तदाब वाढल्याचे स्पष्ट झाल्यास तो योगाने तंदुरुस्त होऊ शकतो का?
- नक्कीच. तेही तत्काळ. अनुलोम-विलोम करा, शवासन करा. ध्यान लावा, ओमकार करा. रक्तदाब सामान्य होईल. या साठी सकाळची १० मिनिटे द्यावी लागतील. याचा तत्काळ फायदा दिसेल. योगामुळे उशिरा फायदा होतो, असे म्हणणे चुकीचे आहे.


>योग आणि ध्यान यांच्यात काय आंतरसंबंध आहे?
- योग ही एक प्रक्रिया आहे. फक्त ध्यानधारणा केली तर आपल्याला मानसिक शांती मिळेल. मात्र शरीर स्वस्थ होणार नाही. केवळ आसने-प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळणार नाही. केवळ प्राणायाम केल्यास रोग मिटतील, मात्र मानसिक शांतता मिळणार नाही. समग्रत्व हेच योगाचे मूळ आहे, तीच गुरुकिल्ली अाहे.


>याेगामुळे वर्तनात बदल होऊ शकतो?
- योग अस्तित्वात बदल घडवतो. योग करणाऱ्या व्यक्ती समाजात एकता, समरसता, न्याय, सद््भावना, सहिष्णुता, सौहार्द, सदाचारासाठी काम करत आहेत. योगाला अंतर दिल्यास समाजात दुराचार, अनाचार, व्यभिचार, भ्रष्टाचार, हिंसाचार, द्वेष, बेइमानी वाढेल.


>प्रदूषित हवेत घेतलेला श्वास आयुष्य घटवत आहे का? त्यापासून वाचण्यासाठी काय उपाय?
- योगामुळे प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून ९० टक्क्यांपर्यंत बचाव करता येऊ शकतो. तरीही १०% दुष्परिणाम होईलच. योग शरीराला आत-बाहेरून मजबूत बनवतो. यामुळे आयुर्मान २५ टक्क्यांनी वाढू शकते. योग शरीराचे फिल्टर आहे. ते वैचारिक, व्यावहारिक प्रदूषणाचाही मुकाबला करू शकतो. 


>श्वास आणि प्राण यात संबंध आहे?
- वैद्यकीय शास्त्रानुसार आपण श्वासोच्छ्वासामुळे जिवंत असतो. मात्र हे सत्य वरवरचे आहे. सूक्ष्म सत्य आहे की, विशेष पद्धतीने घेतलेला श्वास आजार दूर करू शकतो. भौतिकवाद्यांसाठी प्राण हे आयुष्याचे तत्व आहे. योग्यांनी त्याला औषधीय तत्व मानले आहे. प्राणाचा उद््भव योग करत राहिल्यानेच होईल. सामान्य श्वास विशेष पद्धतीने घेणे ही स्वरसाधना आहे. यामुळे शरीरात श्वासाचा प्रवास सुरू होतो. तो असतो इडा, पिंगळा आणि सुषुम्नाचा प्रवास. 


>आसने-प्राणायाम करणे हेच योग आहे?
योगाचे अनेक पैलू आहेत. यात एक आहे शारीरिक विकास. दुसरा- इंद्रियांचे बळ व पावित्र्य, जेणेकरून वयाच्या शंभरीपर्यंत पाहता-ऐकता येईल. मनात बीज रूपात उपस्थित ‘शुभ’चा वटवृक्ष बनवणे, पशुत्व व वाईटाचे निर्बीजीकरण करणे हेही योगच आहे. 


>म्हणजे अात्मिक विकास...  
- अात्मिक विकासासाठी वेगळी साधना अाहे. जीवनातून ब्रह्मापर्यंत पाेहाेचण्याचा प्रवास म्हणजे याेग. त्यासाठी मेंदूच्या स्तरावर प्राेग्रामिंग करावी लागते. मेंदूच्या डिव्हाइन प्राेग्रामिंगला कर्मयाेग म्हणतात. चुकीच्या प्राेगामिंगमुळे व्यक्ती नक्षलवादी, बेइमान व दुराचारी बनत अाहे. ज्ञान, भावना, कृती हेच जीवन अाहे. जीवनाच्या सार्वभाैमिक मूल्यांचे पालन म्हणजे अष्टांग याेग. यम नियमांचे पालन अावश्यक अाहे. यम नियम म्हणजे पाच नियम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य अाणि अपरिग्रह.  


>इंजिनिअरिंग, मेडिकलच्या प्रवाहाप्रमाणे याेगाला महत्त्व येईल का?   
- का नाही. अायअायटीयन, अायअायएम, हार्वर्डसारख्या अनेक बिझनेस स्कूलमध्ये शिकणाऱ्यांच्या तुलनेत याेगी ज्या क्षेत्रात असेल त्यात ताे शिखरावरच असेल. ताे तमाम व्यावसायिक काेर्सवाल्या लाेकांपेक्षा निश्चित पुढे असेल. अाम्ही पतंजली विद्यापीठात असा प्राेफेशनल काेर्स सुरू करणार अाहाेत.  


>याेग दिवस हा फक्त इव्हेंट अाहे का?   
- याेग हा तर सिस्टिमचा हिस्सा बनला पहिजे. याेग एक दिवसाचा इव्हेंट हाेऊच शकत नाही. याेग दिन हा तर केवळ जनजागृतीसाठी साजरा केला जाताे. सरकार त्यासाठी प्रयत्न करत अाहे, अाम्हालाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. याेगाचा धर्माशी काहीही संबंध नाही. अाज याेग हा सिस्टिमचा हिस्सा बनण्यात दाेन माेठे अडथळे अाहेत. स्वार्थी धार्मिक नेते व स्वार्थी राजकीय नेते.  


>एखाद्या कंपनीला याेगाप्रमाणे चालवता येईल का?  
- पतंजलीप्रमाणे चालवा. मॅनेजमेंटमध्ये सध्या अाध्यात्मिक जाणिवा किंवा अाध्यात्मिक श्रेष्ठत्व शिकवले जात अाहे. जर तुम्ही अाध्यात्मिक कुशलतेने काम करत असाल तर दाेन गाेष्टी हाेतात. एक- अधिक समृद्धी अाणि दुसरी- ही समृद्धी सेवेसाठी. म्हणजे अर्थ स्वार्थासाठी नव्हे तर सर्वांसाठी.  


>पाच हजार वर्षे जुना याेग तेव्हाच्या काळात उपयाेगी हाेता, अाता परिस्थिती बदलली तसा याेगही बदलला का?  
- सृष्टीप्रमाणेच याेगातही सार्वभाैमिक नियम अाहे, ताे बदलणार नाही. पण व्यवहार व क्रियांत निश्चित बदल हाेईल. प्रदूषण व अाजारपण वाढत अाहे. समाजाच्या गरजाही बदलू लागल्या अाहेत. अशात याेगाच्या व्यावहारिकेतही बदल हाेत अाहे. हजाराे वर्षांपूर्वी धार्मिक संप्रदाय नव्हते, ते अाज अाहेत. हे लक्षात ठेवावे लागेल. जसजसे शरीरात अाजार वाढतील, तसा याेग बदलेल. जसे कपालभाती, प्राणायाम. त्याचा वेळ वाढवल्याने अनेक समस्यांचे निराकरण झाले. अाधी शीर्षासनामुळे काम हाेत हाेते, मात्र अाता  दुसरे अासन करावे लागत अाहे.

बातम्या आणखी आहेत...