आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख जणांना इन्कम टॅक्सची नोटीस, नोटबंदी दरम्यान अकाऊंटमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त केले जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोटबंदी दरम्यान आपल्या खात्यात 15 लेखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्या जवळपास 2 लाख लोकांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोटीस जारी केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चेअरमन सुशील चंद्रा म्हणाले, 'नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या खात्यात 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. त्यानतंर कोणतेही रिटर्न फाइल केले गेले नाही. डिपार्टमेंटने डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अशा जवळपास 1.98 खातेदारांची यादी तयार करुन त्यांना नोटीस बजावली आहे.'

 

3 हजार लोकांवर केस 
- चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 महिन्यात टॅक्स चोरी, उशिराने टॅक्स फाइल करणारे आणि हेराफेरी करणाऱ्या जवळपास 3 हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

- चंद्रा म्हणाले, डिजिटायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई-असेसमेंट (डिजिटल पद्धतीने कर भरणा) यावर भर देत आहे. 
- त्यासाठी यावर्षी प्रायोगित तत्वावर  ई-असेसमेंट केले जात आहे. गेल्या तीन महिन्यात 60 हजार ई-असेसमेंट करण्यात आले. येत्या काळात त्याला अधिक व्यापक स्वरुप देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...