आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनु शर्माला सोडल्यास मला काही हरकत नाही, जेसिकाची बहीण सबरीनाचे तुरुंग अधिकाऱ्याला पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल जेसिका लालची 29 एप्रिल 1999 मध्ये हत्या करण्यात आली होती. - Divya Marathi
मॉडेल जेसिका लालची 29 एप्रिल 1999 मध्ये हत्या करण्यात आली होती.

नवी दिल्ली - जेसिका लाल हत्याकांडात दोषी ठरलेला आणि तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मनु शर्माला जेसिकाची बहीण सबरीनाने माफ केले आहे. डोक्यामध्ये फक्त राग आणि द्वेष ठेवून जगू शकत नाही, असे तिने म्हटले आहे. मनु शर्माला तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे सोडण्यात येणार असल्याच्या वृत्तावर तिने म्हटले आहे की 1999 पासून मी हा खटला लढत आहे, तोही आता तुरुंगात आहे. आता त्याला सोडले जात असेल तर मला त्यात काही हरकत नाही. तसे पत्र तिने तुरुंग अधिकाऱ्याला पाठवले आहे. 

 

 

सबरीनाने लिहिले तुरुंग वेलफेअर ऑफिसरला पत्र 
- रिपोर्ट्सुनासर, सबरीनाने तिहार तुरुंगाच्या वेलफेअर ऑफिसरला पत्र लिहिले आहे. त्यात तिने लिहिले, की मला मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगात मनु शर्माचे वर्तन चांगले आहे आणि तुरुंगातील सहकाऱ्यांसोबत त्याचे वर्तन चांगले आहे, त्यांची तो मदत करत आहे. हे पाहाता त्याच्यात बदल होत असल्याचे दिसते. 
- सबरीना म्हणाली, 'मी 1999 पासून लढत आहे.  त्यानेही (मनु शर्मा) तुरुंगात 15 वर्षे काढली आहेत. मी आणखी राग आणि द्वेषासह जगू शकत नाही. मला वाटते, जर मनु शर्माला सोडले जात असेल तर त्यात मला काही हरकत नाही. त्याचे काही खास कारण नाही, मात्र तुम्हाला तुमच्या डोक्याला विश्राम देऊन आयुष्य पुढे नेले पाहिजे.'

 

6 महिन्यांपासून खुल्या कारागृहात मनु शर्मा 
- तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे मनु शर्मा गेल्या 6 महिन्यांपासून खुल्या कारागृहात आहे. त्याला काही कामानिमित्त दिवसभर बाहेर राहून संध्याकाळी तुरुंगात येण्याची परवानगी आहे. 2009 मध्ये त्याला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. तेव्हा त्याने सांगितले होते, की त्याच्या आजीचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यावर कुटुंबाच्या बिजनेसची जबाबदारी आहे. 2011 मध्ये त्याला पुन्हा एकदा भावाच्या लग्नानिमित्त पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यानंतर 2013 मध्ये पदव्युत्तर परीक्षेसाठी सोडण्यात आले होते. 


काय आहे जेसिका लाल हत्याकांड 
- मॉडेल जेसिका लालचा 29 एप्रिल 1999 मध्ये मनु शर्माने गोळ्या झाडून खून केला होता. मनू शर्मा दिल्लीती एका बारमध्ये बार टेंडर होती. दिल्लीतील महरौली भागातील कुतूब कोलोनाडे येथे सोशलाइट बीना रमानीच्या टॅमरिंड कोर्टमध्ये वेळ संपल्यानंतर मनु शर्माला दारू देण्यास नकार दिला होता. या कारणाने भडकलेल्या मनुने जिसकावर गोळ्या झाडल्या होत्या. 
- या हत्ये प्रकरणी 2006 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले होते. या घटनेला देशभरातून विरोध झाला होता. त्यानंतर हायकोर्टाने स्वतः दखल देत पुन्हा सुनावणी सुरु केली आणि मनु शर्माला हत्येत दोषी ठरवले. दिल्ली हायकोर्टाने 2006 मध्ये त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

बातम्या आणखी आहेत...