आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Janata Dal United Will Conteste 2019 Lok Sabha Elections With National Democratic Alliance

जदयू लोकसभेत रालाेआसोबत, चार राज्यांमध्ये मात्र स्वबळावर !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जनता दलाने (संयुक्त) २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व मिझोराममध्ये मात्र ते यंदाच्या विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. 


रविवार जदयूच्या राजधानीत आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री नितीशकुमार होते. पश्चिम बंगालवर लक्ष असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. जनता दल संयुक्त पक्ष भ्रष्टाचार व जातीयवादाच्या विरोधातील आपली लढाई सुरूच ठेवणार आहे. पक्षाला संपवण्याची भाषा करणारेच बिहारमध्ये संपुष्टात येतील, अशा शब्दांत बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विराेधकांवर टीका केली. 


जनता दल संयुक्त भावी काळातही भाजपसोबत कार्यरत राहणार आहे. ही आघाडी कायम राहणार आहे, असे नितीश यांनी सांगितले. रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. 


आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आघाडीसाठी ४० जागांविषयीचा मुद्दा सोडवण्यात येईल. भाजपने अद्याप काहीही प्रस्ताव दिलेला नाही. भाजपने काही प्रस्ताव सादर केल्यानंतरच जनता दल संयुक्त योग्य तो निर्णय घेईल, असे पक्षाचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी म्हटले आहे. 


रालाेआवर दबावाची रणनीती 
जदयू मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील निवडक जागांवर आपले उमदेवार उभे करणार आहे. त्यामागे एनडीएवर दबाव वाढवण्याची व े माजी अध्यक्ष शरद यादव यांचा प्रभाव कमी करण्याचा उद्देश आहे. 

बातम्या आणखी आहेत...