आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा मासळी बाजार करू नका- सर्वोच्च न्यायालय; न्या. लोया प्रकरणाची सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीआयचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना याचिकाकर्त्यांच्या वकिलात हमरीतुमरी झाली. यात न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत  वकिलांनी न्यायालयाचा मासळी बाजार करू नये, अशी तंबी त्यांना दिली. दोन विधिज्ञांत पुन्हा वादावादी झाल्यानंतर असे वर्तन योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी ते सहकारी न्यायमूर्तींच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते. काही 


माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्यांच्या मृत्यूचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान  अनपेक्षित  भूमिका घेत बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे वकील दुष्यंत दवे यांनी २ न्यायमूर्तींसह ११ लोकांच्या उलटतपासणीसाठी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज केला आहे.  
वकील शिसोदिया म्हणाले, कोणीही बेछूट आरोप करू नयेत. दवे म्हणाले, तुम्ही अमित शहा यांचे वकील आहात. खटला रफा दफा करण्यासाठी आला आहात काय?  

सर्वाेच्च न्यायालयातून लाइव्ह  

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सोमवारी न्या. लोया यांच्या मृत्यूच्या तपासाशी संबंधित याचिकावर सुनावणी घेतली. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे हजर झाले. महाराष्ट्रातील पत्रकार बी. एस. लोणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पल्लव शिसोदिया हजर होते. वाचा त्यांच्यातील चर्चा : 

- पल्लव शिसोदिया : या खटल्यात परस्परविरोधी अहवाल आहेत. स्वतंत्र चौकशी एकतर्फा वाहतुकीसारखी नसावी. काेणीही व्यक्ती  बेछूट आरोप करून सुटका करून घेऊ शकत नाही. अशा बेजबाबदार आरोपांमुळे सर्वाेच्च न्यायालयासह न्यायपालिकेची प्रतिष्ठा आणि तिच्यावरील विश्वासाला तडे जात आहेत.   

यावरून दुष्यंत दवे आणि इंदिरा जयसिंह भडकले.  
- दुष्यंत दवे : जर तुमच्या पक्षकाराची चौकशी नको असेल तर याचिका का दाखल केली? हा खटला रफा दफा करण्यासाठीच तुम्ही याचिका दाखल केली आहे. तुम्ही तर अमित शहा यांच्यासाठीही आला होता. आता या याचिकाकर्त्यांसाठी आला आहात.  
- शिसोदिया : तुमच्या अशा बोलण्यानेे मला काही फरक पडत नाही. यू गो टू हेल ऑर हेवन. जेथे जायचे तेथे जा.  
- न्या. डी.वाय. चंद्रचूड : मि. दवे, तुम्ही चूप बसा. न्यायालयाचा मासळी बाजार करू नका. न्यायमूर्ती बोलत असतील तर मोठ्याने बोलण्याची गरज नाही.  
दुष्यंत दवे बोलतच होते.  
- न्या. चंद्रचूड : तुम्हाला आमचे ऐकावेच लागेल.. तुमची वेळ आल्यानंतरच बोलू शकता.  
- दवे : नाही. मी काही ऐकणार नाही. माझ्यासारख्या वकिलांचा आवाज दाबण्यासाठी कौन्सिल ऑफ इंडियासुद्धा नोटीस काढते आहे. न्यायालयाने साळवे व शिसोदिया यांना या खटल्यात हजर होण्यापासून रोखावे. ते अमित शहा यांचे वकील होते. तुम्हाल तुमच्या अंतरात्म्याला उत्तर द्यावे लागेल.  
- पीठ : आम्हाला अंतरात्म्याबद्दल काही सांगू नका. तुमचे वर्तन अक्षम्य आहे. दवे आणि शिसोदिया यांची भाषा योग्य नव्हती. असे बोलणे तर मासळी बाजारातही होत नाही. शिष्टाचारामुळे शिष्टाचार मिळतो.

 

बातम्या आणखी आहेत...