आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहली व महेंद्रसिंग धाेनी गाठणार दहा हजारांचा पल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीला अाता अागामी वनडे मालिकेत धावांचा दहा हजारांचा पल्ला गाठण्याची संधी अाहे. येत्या गुरुवारपासून भारत अाणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. भारताच्या २९ वर्षीय विराट काेहलीने २०८ सामन्यांत ५८.१० च्या सरासरीने एकूण ९५८८ धावा काढल्या अाहेत. अाता त्याला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४०२ धावांची गरज अाहे. 


तसेच माजी कर्णधार अाणि यष्टिरक्षक धाेनीच्या नावे ३१८ सामन्यांत ५१.३७ च्या सरासरीने ९९६७ धावांची नाेंद अाहे. अाता ताे अवघ्या ३३ धावा काढून दहा हजार धावा पूर्ण करू शकताे. यासाठी भारताचे हे दाेन्ही खेळाडू उत्सुक अाहेत. 


जागतिक स्तरावर अातापर्यंत केवळ ११ क्रिकेटपटूंना हा दहा हजार धावांचा पल्ला पार करता अाला. यात भारताचा सचिन तेंडुलकर १८ हजार ४२६ धावांसह अव्वल स्थानावर अाहे. तसेच भारताचा माजी कर्णधार साैरभ गांगुली (११३६३) अाणि राहुल द्रविड (१०८८९) हे दाेघेही सहभागी अाहेत.

बातम्या आणखी आहेत...