आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैराना: EVM मशिन्स खराब करून भाजपकडून छेडछाड- RLD उमेदवाराची EC कडे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांनी निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे. - Divya Marathi
राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांनी निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

लखनौ- कैराना येथील पोटनिवडणुकीत भाजप सत्तेचा दुरूपयोग करत आहे. निवडणूक अधिकारीच EVM मशिन्स खराब करून मतदान करायला आलेल्या नागरिकांना अडवत आहेत. कैरानात सर्वत्र मतदान यंत्रांशी छेडछाड केली जात आहे. मुस्लिम व दलित भागातील मतदानयंत्रे बदलली जात नाहीत असा गंभीर आरोप करत राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार   तबस्सुम हसन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

 

महाराष्ट्रातील पालघर व भंडारा-गोंदियासह उत्तर प्रदेशातील कैराना येथेही लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तेथे भाजपच्या मृगांका सिंह यांची लढत राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांच्याशी होत आहे. मात्र, हसन यांना काँग्रेससह सपा, बसपा आणि आपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची घाबरगुंडी उडाली आहे.

 

दरम्यान, आज सकाळपासून कैरानात मतदान यंत्रात घोळ होत असल्याच्या व मशिन्स बंद पाडल्याच्या तक्रारी येत आहेत. कैरानात सकाळपासूनच 300 ठिकाणी मशिन्स बंद पडल्या आहेत. खासकरून मुस्लिम व दलित भागातील मतदान यंत्रांत छेडछाड झाल्याचा आरोप आरएलडीच्या उमेदवार हसन यांनी केला आहे. कैरानातील गंगोह विधानसभा क्षेत्रातील गांधीनगर, कलालहती, बल्लमजरा, तातारपुर, गंगोह ब्लॉक, बेगी, सांगाठेड़ा, हुसैनपुर आदी ठिकाणी ईव्हीएम खराब झाल्या होत्या. तर अनेक बूथवर ईव्हीएम मशिन्स खराब झाल्याने सकाळी 9. 30 वाजेपर्यंत मतदानच होऊ शकले नाही.

 

हसन म्हणाल्या, आज दलित व मुस्लिम नागरिकांत होत असलेले मतदान पाहून भाजप घाबरला आहे. रमजानचा महिना असल्याने मुस्लिम उमेदवार दिवसा बाहेर पडणार नाहीत असा अंदाज होता पण मुस्लिम लोक मतदानाला बाहेर पडत आहेत. त्यामुळे मुस्लिम बहुल व दलित मतदार असलेल्या भागात मतदानयंत्रे खराब करून वेळ वाया घालवला जात आहे जेणेकरून वोक वैतागून मतदान न करता परत जावेत. शामली आणि नुरपूर भागातील 175 बूथवर हा प्रकार घडला आहे. याची चौकशी झाली पाहिजे, सोबत येथे मतदानयंत्राशी छेडछाड केली जात आहे. त्याचमुळे तेथील व्हीव्हीपॅट मशिन्स खराब करून बंद पाडल्या आहेत, याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी असे सांगत तबस्सुम हसन यांनी तक्रार दाखल केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...