आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील अस्वच्छ रेल्वे स्थानकात कल्याण तिसरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सर्वात प्रदूषित शहरानंतर कानपूर येथील सेंट्रल रेल्वे स्थानक देशातील सर्वाधिक अस्वच्छ रेल्वे स्थानक ठरले आहे, तर कल्याण तिसरे रेल्वे स्थानक ठरले आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका पाहणीतून उघड झाली आहे. रेल्वेने इंटरेक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स सिस्टिम (आयव्हीआरएस)च्या माध्यमातून गेल्या ११ ते १७ मेदरम्यान हा   सर्व्हे  करण्यात आला.

 

यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आणि तिकिटाच्या खिडक्यावर प्रवाशांकडून मोबाइल क्रमांक घेण्यात आले. यात ३४२ रेल्वेगाड्या पैकी ३०० रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांशी वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली. यात प्रत्येक रेल्वेगाडीतील ६० प्रवाशांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या आधारावर पाहणी अहवाल करण्यात आला. त्यानंतर देशातील टॉप १० अस्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जारी करण्यात आली. यादीमध्ये कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशन पहिल्या क्रमांकावर आहे.

 

या दहा अस्वच्छ रेल्वे स्थानकात उत्तर प्रदेशातील चार व मुंबईतील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार रेटिंगमध्ये बिहारमधील पाटणा रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावर, मुंबईचे कल्याण तिसऱ्या तर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या मतदारसंघातील वाराणसी जंक्शन चौथ्या व लोकमान्य टिळक रेल्वे स्थानक पाचवे सर्वाधिक अस्वच्छ रेल्वे स्थानक ठरले आहे.  


सर्व्हेत ६१ % प्रवाशांनी कानपूर सर्वाधिक अस्वच्छ म्हटले  : सर्व्हेनुसार, ६१.०६ % प्रवाशांनी कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक सर्वाधिक अस्वच्छ असल्याचे सांगितले. ६०.१६% प्रवाशांनी पाटणा रेल्वे स्थानक खूप अस्वच्छ असल्याची माहिती दिली. ५६ % प्रवाशांनी मतांच्या आधारावर वाराणसी चौथ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले.  याशिवाय अस्वच्छ रेल्वे स्थानकात अलाहाबाद सहाव्या, जुनी दिल्ली सातव्या, लखनऊ नवव्या तर चंदिगड दहाव्या स्थानावर आहे. 


३०० रेल्वेतील प्रवाशांशी चर्चा 

 रेल्वेच्या सर्व्हे  पथकाने कानपूरच्या सेेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या ३४२ पैकी ३०० रेल्वे स्थानकातील प्रवाशांशी फोनवर संवाद साधला. जेव्हा या रेल्वे कानपूरहून निघाल्या तेव्हा प्रत्येक रेल्वेगाड्यातील ६० प्रवाशांशी संवाद साधला. यात खानपानाबाबत अस्वच्छता, प्लॅटफाॅर्मची अस्वच्छता व एसी कोचमधील बिछान्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...