आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ गँगरेप: कॉग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांचा इंडिया गेटवर कँडल मार्च; प्रियंका गांधींची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍ली- उन्नाव व कठुआ प्रकरणांच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढला. यात  प्रियंका गांधी, रॉबर्ट वढेरा, काँग्रेस नेत्यांसह नागरिक सहभागी होते. कठुआमध्‍ये 8 वर्षाच्‍या मुलीवर बलात्‍कार झाला आहे. ही घटना  मानवतेच्‍या विरोधात असल्‍याची टीका राहूल गांधी यांनी केली आहे.

 

असे घडले क्रौर्य...
तथापि, कठुआमध्ये 10 जानेवारी रोजी 8 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. 12 जानेवारीला तिच्या वडिलांनी हीरानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. 17 जानेवारीला चिमुकलीचा मृतदेह विछिन्न अवस्थेत जंगलात आढळला. मुफ्ती सरकारने 23 जानेवारीला पूर्ण प्रकरण जम्मू-काश्मीर क्राइम ब्रँचला सोपवले. क्राइम ब्रँचने एसआयटी स्थापन केली आणि तपासानंतर 9 एप्रिल रोजी 8 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे म्हणणे आहे की, लवकरच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाईल.


मंदिरात केला गँगरेप
चार्जशीटमध्ये सांगितले की, गँगरेपचा मास्टरमाइंड मंदिरातील पुजारी संजी राम आहे. त्याने कठुआमधून बकरवाल समुदायाला हटवण्यासाठी हे कृत्य केले. संजी रामने हे कृत्य 'देवस्थान' नावाच्या मंदिरात केले. त्याने आपल्या कटात अल्पवयीन पुतण्यासह आणखी 6 जणांना सामील केले. जंगलातून चिमुकलीला किडनॅप केल्यानंतर ती ओरडू नये म्हणून तिला हायडोस 'क्लोनाजेपम' नावाचे गुंगीचे औषध दिले. यानंतर तिला मंदिरात आणून तिच्यावर रेप केला.


हत्या करण्याआधीही केला रेप..
चार्जशीटनुसार, आरोपी चिमुकलीवर आळीपाळीने रेप करत होते. एवढेच काय, एका आरोपीने मेरठमध्ये शिकणाऱ्या आपल्या चुलत भावाला फोन करून बोलावले. म्हणाला- मजा लूटना है तो आ जाओ. चिमुकलीची हत्या करण्याआधी पोलिस अधिकार दीपक खजुरिया म्हणाला की, थोडं थांबा, मला आणखी एकदा रेप करायचा आहे. यानंतर चिमुकलीवर पुन्हा रेप करून तिची हत्या करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...