आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींच्या निमंत्रणावरून 18 दिवसांनी जाॅर्डनचे राजे अाले भारतात; दुसरा दाैरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जाॅर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हे मंगळवारी नवी दिल्लीत पाेहाेचले. ते १ मार्चपर्यंत भारताचा दाैरा करतील. हा त्यांचा दुसरा भारत दाैरा अाहे. ते यापूर्वी २००६मध्ये भारतात अाले हाेते. या वेळी त्यांच्यासाेबत ३०० सदस्यांचे प्रतिनिधी मंडळही अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी व अब्दुल्ला यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय बैठक हाेईल. या बैठकीत संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, अाराेग्यसेवा अादी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केली जाऊ शकते.


मध्य-पूर्वेतील जाॅर्डन हा भारताचा असा भागीदार देश अाहे, जाे इस्रायल व पॅलेस्टाइनसह अरब देशांत संतुलन कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावताे. किंग अब्दुल्ला हे स्वत: दहशवादाविराेधात उभे ठाकले अाहेत. ते अल-कायदा व इसिससारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्यासाठी भारताची मदत करू शकतात. 


किंग अब्दुल्ला-२ यांचा भारत दाैरा
जाॅर्डनचे किंग अब्दुल्ला-द्वितीय बिन अल हुसैन तीन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर अालेत. पंतप्रधान माेदी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर त्यांचे स्वागत केले.


दहशतवादाविरुद्ध लढणारे नेते म्हणून अब्दुल्लांची अाेळख
मध्य-पूर्वेत जेथे संघर्ष व युद्धाची स्थिती अाहे, तेथे जाॅर्डन हा देश स्थायित्व व ताळमेळास महत्त्व देताे. किंग अब्दुल्ला द्वितीय हे माेहंमद पैगंबर यांच्या ४१व्या पिढीचे वंशज अाहेत. कट्टरपंथी व दहशतवादाविराेधात लढणारे नेते म्हणून अब्दुल्ला यांना जागतिक स्तरावर अाेळखले जाते. या दाैऱ्यात ते इस्लामवर मते व्यक्त करणार अाहेत. १९५०पासून भारत व जाॅर्डनमध्ये सकारात्मक संबंध अाहेत.


पॅलेस्टाइनच्या रामल्ला येथे जाताना मोदींसाठी जॉर्डनने पाठवले हाेते अापले हेलिकॉप्टर  
पंतप्रधान माेदी हे याच महिन्यात ९ तारखेला पॅलेस्टाइनला जाण्यापूर्वी जाॅर्डनमध्ये एक दिवस थांबले हाेते. त्या वेळी माेदींनी अब्दुल्ला यांना फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात येण्याचे निमंत्रण दिले हाेते. त्या वेळी जाॅर्डनने माेदींना पॅलेस्टाइनला जाण्यासाठी अापले हेलिकाॅप्टर पाठवले हाेते. या हेलिकाॅप्टरला इस्रायलच्या लढाऊ विमानांनी स्काॅट केले हाेते.


भारत हा जॉर्डनचा चौथा सर्वात माेठा भागीदार, जाॅर्डनशी भारताचा १० हजार काेटींचा व्यापार
इराक, साैदी अरेबिया व चीननंतर भारत हा जाॅर्डनचा चाैथा सर्वात माेठा व्यापारी भागीदार अाहे. भारत व जाॅर्डनदरम्यान वार्षिक १० हजार काेटींचा व्यापार हाेताे. जाॅर्डनमध्ये भारताने जाॅर्डन-इंडियन फर्टिलायझर्स लि.मध्ये ५,६०० काेटींची गुंतवणूक केली अाहे. यावरून दाेन्ही देशांचे संबंध मजबूत असल्याचे स्पष्ट हाेते. या गुंतवणुकीमुळे तेथे फाॅस्फेटच्या खाणींतून खते तयार केली जात अाहेत. 


इस्लाम की विरासतवर दिल्लीत भाषण देतील किंग अब्दुल्ला द्वितीय
- द्विपक्षीय चर्चेपूर्वी राष्ट्रपती रामनाथ काेविंद हे अब्दुल्ला यांना भाेजनाचे निमंत्रण देतील. त्यानंतर अब्दुल्ला हे बुधवारी अायअायटी-दिल्लीत जातील व तेथे जाॅर्डन टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या संबंधावर चर्चा करतील.
- २८ मार्च राेजी भारताची व्यापारी संघटना भारतीय-जाॅर्डन बिझनेस फाेरमची सीईअाे स्तराची बैठक अायाेजित करतील. यादरम्यान खते व वस्त्राेद्याेग क्षेत्रातील करार हाेण्याची चिन्हे अाहेत.
- १ मार्च राेजी किंग अब्दुल्ला हे सांस्कृतिक केंद्रात ‘इस्लाम की विरासत’ या विषयावर अायाेजित परिषदेत भाषण देतील. यादरम्यान ते इस्लामचे विचार व कुराणावरील एका पुस्तकाचेही प्रकाशन करतील.

बातम्या आणखी आहेत...