आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप व १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप व १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड‌्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) अन्नसुरक्षा व मानक कायद्यातील दुरुस्त्यांत ही शिफारस केली आहे. 


एफएसएसएआयने भेसळीविरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कठोर तरतुदींची शिफारस केली. कायद्यात एकूण १०० दुरुस्त्यांचा मसुदा जारी केला आहे. अन्नभेसळीवर कारवाईसाठी एक स्वतंत्र सेक्शनच जोडण्याचा प्रस्ताव आहे. मसुद्यात म्हटले आहे की, एखाद्याने खाण्यापिण्याच्या पदार्थांत हानिकारक गोष्टींची भेसळ केली आणि ते खाणाऱ्या व्यक्तीला नुकसान, मृत्यू, जखमी किंवा तो आजारी पडला तर अशा भेसळखोराला कमीत कमी सात वर्षांची शिक्षा दिली पाहिजे. ती वाढवून जन्मठेपही करता येईल. दंडही १० लाख रुपयांपेक्षा कमी नसावा. दुरुस्त्यांवर २ जुलैपर्यंत लोकांकडून मते मागितली आहेत. 


दुसरीकडे, राज्यांतही अन्नसुरक्षा प्राधिकरण स्थापण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून हा कायदा योग्य पद्धतीने लागू करता येईल. भेसळखोराला अन्नपदार्थांच्या चाचण्यांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचीही भरपाई करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...