आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीच्या तापमानास २४ अंशांची लावणार मर्यादा; वर्षभरात सुमारे २० अब्ज युनिट वीज वाचणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशभर एसीचे किमान तापमान २४ अंशांवर ठेवले जावे यासाठी नियम करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे दरवर्षी २० अब्ज युनिट वीज बचत होऊ शकेल. शिवाय, लोकांचे आरोग्यही चांगले राहील. ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी शुक्रवारी एसी क्षेत्रात ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अभियान सुरू केले. 


सिंह म्हणाले, एसीचे तापमान वाढवले तर वीजवापर ६ % कमी होतो. मानवी शरीराचे तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सियस असते. मात्र, हॉटेल्स व कार्यालयांत ते १८-२१ अंश ठेवले जाते. याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. जपानसह काही देशांनी हे तापमान २८ अंश ठेवण्यासाठी नियम केले आहेत. 


एसी उत्पादकांनाही सल्ला
उत्पादक कंपन्यांनी एसीमध्ये किमान तापमानाची २४ अंशांची मर्यादा ठेवावी, असा सल्ला कंपन्यांना देण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...