आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिन : राजपथावर महिलाशक्तीचे ऐतिहासिक प्रदर्शन, महिलांनी केेले पाच तुकड्यांचे नेतृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. लोकशाहीचा हा उत्सव अनेक अर्थाने सर्वांसाठी खास आहे. 44 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एकापेक्षा अधिक विदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यात 10 ASEAN देशांच्या प्रमुखांचा समावेश आहे. 90 मिनिटांच्या या परेडमध्ये प्रथमच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महिला सदस्य बाइक स्टंट केले. तसेच संचलनात 5 तुकड्यांचे नेतृत्व महिलांनी केले. 


UPDATES 

- सलामीनंतर राष्ट्रगीताने झाली राजपथावरील सोहळ्याची सांगता

- 11.37 कार्यक्रमाचा समारोप, राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांचे पथक राजपथावर 

- शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या देखाव्याच्या निमित्ताने राजपथावर 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष

- महाराष्ट्राच्या चित्ररथावर शिवराज्यभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला

- 10 असियान देशांच्या राष्ट्रध्वजांसह राजपुताना रायफल्सच्या तुकडीतील जवानांनी मार्च केले. 

- 10.05 : राजपथावरील परेडला सुरुवात

- राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते कॉर्पोरल ज्योतीप्रकाश निराला यांचा मरणोत्तर अशोक चक्र देऊन गौरव.  

- 10.00 ध्वजारोहण आणि मानवंदना

- 9.55 राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांचे राजपथावर आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत

- असियान देशांच्या प्रमुखांच्या आगमनाला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत स्वागत. 

- 9.38 : राष्ट्रपती रामनाथ कोवींद  राष्ट्रपती भवनातून निघाले

- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आगमन नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर 9.35 वाजता आगमन

- राजपथावर प्रमुख पाहुण्यांच्या आगमनास सुरुवात. 

- शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी येथील डायरीमध्ये अभिप्राय लिहिला

- नरेंद्र मोदींचे इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीला अभिवादन शहिदांना श्रद्धांजली केली अर्पण

- 9.25 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेटवर दाखल. 
- भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केले. 
- पंतप्रधानांनी ट्वीट करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
- प्रजासत्ताक दिनाची परेड 10 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे चालेल. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे काही PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...