आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या दरांमध्ये ५ महिन्यांचा नीचांक; मुंबईत प्रति १० ग्रॅम ३०,२०० रु. भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर देशातील बाजारात सोन्याचे दर पाच महिन्यांच्या नीचाकांवर पोहोचले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम ९५ रुपयांनी घसरून ३१,११५ रुपयांवर पोहोचले. हे यंदा ८ फेब्रुवारीनंतरचे सर्वात कमी दर आहेत. त्या दिवशी सोने ६०० रुपयांनी स्वस्त होऊन ३०,९५० रुपयांवर आले होते. शुक्रवारी मुंबईत ३०,२०० रुपये दर होता. 


यामुळे सोने स्वस्त : अमेरिकेत महागाईची आकडेवारी जारी झाल्याने डॉलर मजबूत झाला. यामुळे सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण कमी झाले. लग्नसराईत मागणी न नसल्याने सोन्यात मंदी आली. स्थानिक ज्वेलर्स-किरकोळ विक्रेत्यांकडूनही मागणी कमीच राहिली. 

बातम्या आणखी आहेत...