आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठीच माओने केले होते भारताशी युद्ध; ‘चायनाज इंडिया वॉर’ पुस्तकातील दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीनचा कम्युनिस्ट नेता माओत्से तुंग याने १९६२ चा हल्ला भारताला ‘सोप्या लक्ष्या’च्या रूपात ठरवून केला होता. या युद्धाद्वारे आपण कोणत्याही बाह्य शत्रूच्या विरोधात चीनला एकजूट करू शकू आणि त्याद्वारे संपूर्ण देशावर पुन्हा आपले नियंत्रण मिळवू शकू, असे माओला वाटत होते. स्वीडनचे युद्धविषयक तज्ज्ञ बर्टिल लिंटनर यांनी ‘चायनाज इंडिया वॉर’ या आपल्या पुस्तकात हा दावा केला आहे.  


लिंटनरने लिहिले आहे की, युद्धाचा आणखी एक हेतू म्हणजे विकसनशील देशांचे नेतृत्व म्हणून उदयास येत असलेल्या भारताला रोखणे हाही होता. जवाहरलाल नेहरूंच्या १९६१ च्या ‘अाघाडीच्या धोरणा’मुळे (फॉरवर्ड पॉलिसी) युद्ध भडकले या धारणेलाही लिंटरन यांनी पुस्तकात आव्हान दिले आहे. 

 
अंतर्गत आघाड्यांवर बदनाम झाला होता माओ  
लिंटनर यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, माओच्या धोरणांमुळे चीनमध्ये पडलेल्या दुष्काळात १९६१ पर्यंत १.७० कोटी ते ४.५० कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. वेगाने औद्योगिकीकरण व्हावे यासाठी माओने ही धोरणे स्वीकारली होती. त्यामुळे माओ खूप बदनाम झाला होता आणि त्याची सत्ता जाण्याची शक्यता प्रबळ झाली होती. त्यामुळे माओने एखाद्या बाह्य शत्रूच्या विरोधात देश विशेषत: सशस्त्र दलांना एकत्र करून आपली सत्ता पुन्हा मजबूत करणे ही उत्तम संधी मानली. भारत हा ‘सोपे लक्ष्य’ आहे, कारण भारताने १९५९ मध्ये दलाई लामांना आश्रय दिला होता, असे माओ मानत होता. दलाई लामा यांनी तेव्हा तिबेटवरील चीनच्या कब्जाविरुद्ध ‘अयशस्वी बंड’ करून तेथून पलायन केले होते.

बातम्या आणखी आहेत...