आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एमडी चंदा कोचर रजेवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्हिडिओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  बोर्डाने सांगितले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत एमडी व सीईओ चंदा काेचर या रजेवर असतील. तोवर संदीप बक्षी हे कामकाज सांभाळतील. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे एमडी व सीईओ बक्षी यांना पाच वर्षांसाठी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) नियुक्त केले आहे. संदीप हे बोर्डाला रिपोर्ट करतील. यानंतर त्यांची रिपोर्टिंग चंदा यांनाच असेल. बँकेच्या बोर्डाने ३० मे रोजी स्वतंत्र चाैकशीची घोषणा केली होती. 


बोर्डाकडून आधी क्लीन चिट 
बँकेच्या बोर्डाने चंदा यांना क्लीन चिट दिली होती. बँकेचे चेअरमन एम.के. शर्मा म्हणाले होते, चंदा यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. व्हिडिओकॉनला कर्ज देण्याचा निर्णय चेअरमन के.व्ही. कामत यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा होता.

 

चंदांच्या पतीच्या कंपनीत धूत यांची गुंतवणूक

चंदा यांचे पती दीपक कोचर यांची कंपनी न्यूपॉवर रिन्युएबल्समध्ये व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी गुंतवणूक केली होती. समूहाला ३,५०० कोटींचे कर्ज मंजूर करताना चंदा यांनी ही माहिती बँकेला दिली नाही. हे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाते. कर्ज पुनर्रचनेतही दीपक यांची भूमिका होती, असा आरोप आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...