आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meeting At The Residence Of Chief Minister Arvind Kejriwal On The Issue Of Sealing

केजरीवालांच्या उपस्थितीत आप व भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची; सीलिंगवर नाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत सीलिंगच्या मुद्द्यावरून मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आत आणि बाहेर जोरदार नाट्य घडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासमवेत भाजप खासदार, आमदार व महापौर सीलिंगच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी निवासस्थानी आले होते.  मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक जनसुनावणीच्या ठिकाणी ठेवली. बैठक सुरू होण्यापूर्वी प्रतिनिधी मंडळ व मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक झाली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या आपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बैठकीत आम्ही तुमचे भाषण ऐकण्यास आलेलो नाही, असे आपच्या एका आमदाराने  मुख्यमंत्र्यांसमक्ष मनोज तिवारी यांना सुनावले. 


या वक्तव्यांवर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ वाढत चाललेला पाहून संतप्त भाजप नेत्यांनी बैठक अर्धवट सोडली.  ते बाहेर पडत असताना  त्यांच्यामागे आपचे आमदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. त्यांनी भाजपचे आमदार व नेत्यांना धक्काबुक्की केली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. भाजप नेत्यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली.  केजरीवाल म्हणाले, ते चर्चा करणार होते. पण भाजप नेते बंद खोलीत चर्चा करण्याच्या मागणीवर अडून बसले. भाजप नेत्यांना मारहाण झाल्याची कल्पना नाही, असेे त्यांनी सांगितले. 


भाजपचे प्रतिनिधी मंडळ बाहेर पडल्यानंतर त्यांच्यामागे आपचे आमदार घोषणा देत धावले. बाहेर माध्यमांशी बोलत असलेल्या प्रतिनिधी मंडळास घेराव घालून आमदार व कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण-धक्काबुक्की केली. या वेळी एका पोलिसाने आमदार अखिलेशपती त्रिपाठी यांची कॉलर पकडली. इतरांनी समजूत घातल्यानंतर पोलिसाने आमदारांची कॉलर सोडली. त्यानंतर आमदार शांत झाले. या संपूर्ण घटनाक्रमात भाजप प्रतिनिधी मंडळास मुख्यमंत्री निवासस्थानापासून मुख्य मार्गावर १०० मीटर दूर अंतरावर नेईपर्यंत १५ मिनिटे लागली.

 

रस्त्यात पोलिसांनी कठडे टाकून भाजप नेत्यांना पाठवले, तर आप आमदार व कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी भाजप नेते जमावापासून आपली सुटका करून घेण्याची धडपड करत होते.
आपने अवमानकारक राजकारण थांबवावे : मनोज तिवारी म्हणाले, मी बैठकीत भाषण देण्यासाठी आलेलो नव्हतो. तर दिल्लीतील २ कोटी जनतेच्या समस्या घेऊन आलो होतो. त्यासाठी वाट्टेल तेथे जाण्यास तयार आहे. आम्हाला राजकारण करायचे असते तर पायी आलो नसतो. विधानसभेचे अधिवेशन बोलावावे.

 

बैठकीत भाजप नेत्यांना बोलूच दिले नाही  

मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या प्रतिनिधी मंडळास सकाळी ९.३० वाजेची वेळ दिली होती. मुख्यमंत्र्यांनी ही बैठक जनसुनवाईच्या हॉलमध्ये ठेवली. तेथे एका बाजूला आपचे आमदार बसलेले होते. दुसरीकडे भाजपसाठी अासने ठेवली होती. ९.१५ वाजता दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाेहोचले. तेथे काही वेळ प्रतिनिधी मंडळ व मुख्यमंत्र्यांत शाब्दिक वाद झाले. भाजप अामदार व कार्यकर्त्यांचा माध्यमांच्या उपस्थितीला आक्षेप होता.  काही वेळाने सीलिंगवर चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ही एक चांगली संधी आहे. येथेच बसून आपण सीलिंगच्या मुद्द्यावर चर्चा करूया. त्यानुसार भाजप व आम्ही आपली जबाबदारी निश्चित करू त्यानंतर जो काही निष्कर्ष निघेल, त्यावर उपराज्यपालांकडे जाऊन म्हणणे मांडू. त्यानंतर मनोज तिवारी आपली बाजू मांडत होते. तेवढ्यात आपचे आमदार जितेंद्र तोमर म्हणाले, आम्ही तुमचे भाषण ऐकण्यास आलेलो नाही. या वक्तव्यानंतर आप व भाजप कार्यकर्त्यांत गोंधळ सुरू झाला. केजरीवाल मनोज तिवारी आणि विजेंद्र गुप्ता यांना अडवत होते

बातम्या आणखी आहेत...