आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची बंगालमध्ये २ वर्षांनंतर सभा; ४२ पैकी २२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये जात आहेत. ते मेदिनीपूर जिल्ह्यात सभा घेतील. तिला शेतकरी कल्याण सभा नाव दिले आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोदींची ही पहिलीच सभा आहे. तिला राज्यात भाजपच्या मिशन २०१९ ची सुरुवात मानले जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांनी गेल्या महिन्यात बंगाल दौऱ्यात स्थानिक नेत्यांनी राज्याच्या ४२ लोकसभा जागांपैकी २२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट दिले होते. आता मोदी येत आहेत. दुसरीकडे, भाजपच्या कर्नाटकातील खासदार शोभा कारंदलाजेंनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ स्टेट वेस्ट बंगाल'मध्ये स्वागत आहे. तेथे शोवन मंडल आणि त्याच्या मित्रांना हेडमास्तरने फक्त 'जय श्रीराम' म्हटल्याने मारहाण केली. 


मोदी घेणार ५ सभा 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, या वर्षी मोदी राज्यात आणखी ५ सभा घेतील. हमीदर वाढवल्याने मोदींच्या अभिनंदनासाठी ही सभा होत आहे. अमित शहा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊ शकतात. ते गेल्या महिन्यातच राज्यात आले होते. सुरेश प्रभू, पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्रीही सतत दौरा करत आहेत. 


भाजपचा बंगालमध्ये जनाधार वाढला, पक्ष दुसऱ्या स्थानी 
२०१४ ला लोकसभा निवडणुकीत भाजपला १६.८०% मते आणि दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजपला राज्यात विस्ताराची शक्यता दिसत आहे. त्याची झलक पोटनिवडणुकीत दिसली. उलुबेरिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला २३.२९% मते मिळाली होती. २०१४ मध्ये तेथे ११.५% मते मिळाली होती. नोआपाडा विधानसभा जागेवर २०१६ मध्ये पक्षाला १३% तर पोटनिवडणुकीत २०.७% मते मिळाली आहेत. डावे आणि काँग्रेसच्या मतांत घट झाली आहे. कोंतई विधानसभा निवडणुकीत भाजप ३०% मतांसह दुसऱ्या स्थानी होता. 


तृणमूलचे नेतेही घेणार सभा 
तृणमूलचे सरचिटणीस सुब्रत बक्षींनी मोदींच्या दौऱ्याआधी संपूर्ण मेदिनीपूर शहरात ममतांचे पोस्टर्स आणि कटआउट्स लावले आहेत. त्याआधी तृणमूलने अमित शहांच्या बीरभूम दौऱ्याच्या वेळीही हीच रणनीती स्वीकारली होती. तृणमूलने शहर आणि आसपासच्या भागांत मोदींच्या सभेच्या दिवशी पक्षनेत्यांची सभाही आयोजित केली आहे. मोदींच्या सभेला येणारी गर्दी कमी व्हावी, हा हेतू. 


मोदींनी मिर्झापुरात बाणसागर योजनेचे केले लोकार्पण 
मोदींनी यूपी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे बाणसागर कालवा योजना आणि १०० जनऔषधी केंद्रांचे लोकार्पण केले. मेडिकल कॉलेजचा शिलान्यासही केला. मोदी म्हणाले की, बाणसागरचा आराखडा ४० वर्षांपूर्वी तयार झाला होता. तेव्हा ही योजना ३०० कोटींत पूर्ण होऊ शकत होती. आता तिला ३५०० कोटी लागले. देशात अजूनही काही योजना प्रलंबित आहेत. 

बातम्या आणखी आहेत...