आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गुरजितसिंग यांचा राजीनामा मंजूर; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे ऊर्जा आणि पाटबंधारे मंत्री राणा गुरजितसिंग यांचा राजीनामा स्वीकारला. वाळू उत्खननाच्या कंत्राटात भ्रष्टाचार केल्याचा आरोप गुरजितसिंग यांच्यावर होता.  


अमरिंदरसिंग यांनी सांगितले की, राणा गुरजितसिंग यांनी १० दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. या मुद्द्यावर मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी गुरुवारी चर्चा केली आणि त्यानंतर सिंग यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला जाईल.   


राणा गुरजितसिंग यांनी त्यांचा स्वयंपाकी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नावावर वाळू उत्खननाचे कंत्राट घेतले होते, असा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. 
गुरजितसिंग यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे की, मी गेल्या १० वर्षांपासून माझ्या कौटुंबिक व्यवसायाशी निगडित होतो, पण अलीकडच्या काळात वाद निर्माण झाल्याने पक्षहितास्तव राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय माझ्यासमोर नव्हता. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.

बातम्या आणखी आहेत...