आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे अपहरण, गोमांसच नव्हे तर ‘घोषणा न देणे’,‘प्रेमीयुगुलाला मदत’मुळेही झुंडीद्वारे हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे देशभरात मॉब लिंचिंग म्हणजे माथेफिरू झुंडीद्वारे लोकांना जबर मारहाण करून हत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मोहंमद अखलाक, डीएसपी अय्युब पंडित, रवींद्र कुमार, जफर खान आणि पहलू खान यांना झुंडीने मारहाण करून ठार करण्यात आले. ही यादी खूप मोठी आहे.

 

मुलांचे अपहरण करणारी टोळी म्हणून संशय आल्याने गेल्या दीड महिन्यात ७ राज्यांतील २० पेक्षा अधिक लोकांची हत्या करण्यात आली. यात आसाम, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटकचा समावेश आहे. या घटनांचे सर्वात मोठे कारण सोशल मीडिया व तत्सम तंत्रज्ञान आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले संदेश,व्हिडिआे अफवांना हवा देतात. पाहून व एेकून त्यावर विश्वास बसतो. या स्थितीत हा झुंड कायदा हाती घेतो. डिजिटल हिंसा छोटी शहरे, दुर्गम गावांत अधिक भयावह रूप धारण करते. काही दिवसांपूर्वी त्रिपुरामध्ये मुलांचे अपहरण करण्याच्या संशयावरून तीन जणांना झुंडीने ठार केले. अागरतळा येथे दोघांची हत्या झाली. कर्नाटकात एका अभियंत्याला ठार केले. अशीच घटना ६ जुलै रोजी घडली. आसाममध्ये झुंडीने ३ साधूंना मारहाण केली. सैन्याच्या जवानांनी त्यांना वाचवले. तामिळनाडूत एका संदेशाद्वारे हिंदी भाषिकांना संघटित करण्यात आले होते.

 

व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज प्रसारित होणे हे सर्वात मोठे कारण
देशभरातील विविध भागांत समोर येणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवरून लक्षात आले की, व्हॉट्सअॅप यासाठी मोठे वाहक ठरत आहे. यामध्ये गटाला संदेश पाठवण्याचे सर्वात सोपे फीचर आहे. व्हॉट्सअॅपचा वापर करणारे सर्वाधिक लोक भारतात असल्याने हा धोका वाढला आहे. जगभरात १ अब्ज लोक याचा वापर करतात. पैकी २५ कोटी भारतीय आहेत. यापैकी बहुतांश लोकांची सकाळ व्हॉट्सअॅपने होते व दिवसाखेरीसदेखील ते याचा वापर करतात. यामुळे माहिती वेगाने प्रसारित होते. बहुतांश लोक माहितीची पडताळणी करत नाहीत. त्याला सत्य मानतात. मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून नुकतेच गर्दीद्वारे हल्ले झाले. व्हॉट्सअॅप आता भारतात ग्रुप मेसेजिंगवर नियंत्रण आणण्यासाठी चाचणी घेत आहे. याअंतर्गत लोक एका वेळी ५ पेक्षा अधिक जणांना संदेश वा मीडिया मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाहीत. चाचणी यशस्वी झाली तर याला नियमाच्या स्वरूपात लागू केले जाईल. 

 

गर्दीला चिथावणी देण्याचे ट्रेंड असे बदलत गेले

> या वर्षी फेब्रुवारीपासून ते १ जुलैपर्यंत देशातील १७ राज्यांमध्ये ३२ पेक्षा अधिक लोकांना झुंडीने मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून मारहाण करून ठार केले. सर्वात ताजी घटना कर्नाटकच्या बिदरची आहे. मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्याला गर्दीने ठार केले.  
> शुक्रवारच्या रात्री राजस्थानच्या अलवारमध्ये गर्दीने गो-तस्करीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या केली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी उत्तर प्रदेशच्या दादरी येथे मोहंमद अखलाकला गर्दीने घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून ठार केले. यानंतर जुलै २०१७ पर्यंत जवळपास २० महिन्यांत गो-तस्करी व गोमांस ठेवल्याच्या संशयावरून विविध घटनांत १४ लोकांचे जीव गर्दीने घेतले.  
> एका अहवालातील केवळ आसामचीच आकडेवारी पाहिल्यास २००१-२०१७ दरम्यान ११४ महिला व ७९ पुरुषांची चेटकीण/जादुटोण्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली. सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांपूर्वीही देशांत असे घडत असल्याचे यातून समोर येते.  

 

या घटनांतून दिसून येते की, याचे एकमेव कारण नाही

२१ फेब्रुवारी २०१६, लातूर महाराष्ट्र : एका विशिष्ट जातीच्या पोलिस कर्मचाऱ्याला गर्दीने ठार केले. त्याने ‘जय भवानी’ची घोषणा देण्यास नकार दिला होता.  
१ एप्रिल २०१७, अलवार, राजस्थान : पहलू खान नामक ५५ वर्षीय पशू व्यापाऱ्याला तथाकथित गोरक्षकांनी गो-तस्करीच्या संशयावरून मारहाण करून ठार केले.
३० एप्रिल २०१७ : नगांव, आसाम : गाय चोरीच्या संशयावरून झुंडीने दोघांची हत्या केली.  
३ मे २०१७, बुलंदशहर, उत्तर प्रदेश : आंतरजातीय विवाह केलेल्या युगुलाला मदत केल्याने झुंडीने गुलाम मोहंमद नामक व्यक्तीला मारहाण करून ठार केले.  
१८ मे २०१७, झारखंड : मुलांचे अपहरण केल्याच्या संशयावरू ७ जणांची हत्या. अशीच घटना महाराष्ट्राच्या धुळ्यात घडली.  
२३ मे २०१७, झारखंड : मुन्ना अन्सारी नामक व्यक्ती नातलगांच्या घरी गेला असता चोर समजून झुंडीने हत्या केली.  
७ जून २०१७, धनबाद, झारखंड: इफ्तार साठी गोमांस घेतल्याच्या संशयाने एकाची हत्या.
१७ जून २०१७, प्रतापगड, राजस्थान : खुल्यामध्ये शौचास बसलेल्या महिलेचा फोटो घेण्यास रोखल्याने जफर नामक व्यक्तीची हत्या.
२४ जून २०१७, बल्लभगड, हरियाणा : ट्रेनमध्ये आसनावरून झालेल्या वादातून जुनैद खान नामक तरुणाला मारहाण करून ठार केले.

 

आतापर्यंतचा घटनाक्रम

१७ जुलै, मंगळवार  
झुंडीचे हल्ले रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. कायदा निर्मितीचा सल्ला दिला. झुंडशाहीला देशाचा कायदा हातात घेण्याची परवानगी नसल्याची टिप्पणी केली. याच दिवशी कर्नाटकच्या बिदरमध्ये मुलांना अपहरण करण्याच्या संशयावरून गुगलच्या अभियंत्यांची हत्या केली गेली.  


१८ जुलै, बुधवार  
मान्सून सत्राच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारवर लिंचिंगबाबतीत उदासीन असल्याचा आरोप केला. यासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी केली. सरकारने ही मागणी फेटाळून लावली. भाजप खा. मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, अशा घटना आर्थिक विषमतेमुळे वाढल्या आहेत. यात द्वेष भावना असल्याचे त्यांचे मत नव्हते.


१९ जुलै, गुरुवार  
सरकारने व्हॉट्सअॅपला आणखी एक नोटीस बजावली.  प्रक्षोभक संदेश व फेक माहितीला चाप लावण्यास सांगितले.  


२० जुलै, शुक्रवार  
संसदेत गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सर्वात मोठे मॉब लिंचिंग १९८४ (शीख दंगल) मध्ये घडले होते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, गुन्ह्यांची माहिती यामुळे उपलब्ध नाही व कारवाईसाठी कोणते कायदेशीर उपाय आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...