आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi And BJP President Amit Shah Go On Fast 12 April Disruptions During Budget Session

संसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाविरोधात मोदी-शाहसह भाजप खासदार गुरुवारी करणार उपवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने सोमवारी केलेल्या उपवास आंदोलनानंतर आता भाजप खासदारही उपवास करणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र होऊ शकले नाही, त्यावरुन विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप 12 एप्रिल रोजी उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या सर्व खासदारांसोबत नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील एक दिवसाचा उपवास करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. गोंधळामुळे संसदेचे 250 तास वाया गेले. संसदेत कामकाज होऊ शकले नाही यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. 

 

18 वर्षात सर्वात कमी कामकाज 
- यंदाच्या अधिवेशनात लोकसभेत एकूण 23% आणि राज्यसभेत 28% कामकाज झाले. याआधी 2000मध्ये लोकसभेची प्रोडक्टिव्हिटी 21% आणि राज्यसभेची 27% होती. 
- यावेळी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा, कावेरी प्रश्न, पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला नीरव मोदी या सारख्या मुद्द्यांवरुन काँग्रेस, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि दुसऱ्या विरोधीपक्षांनी गोंधळ घातला होता. 

 

दोन्ही सभागृहांमध्ये 59 बैठका झाल्या, 78.5 तास कामकाज झाले 

 

लोकसभा 
बैठका - एकूण 29 (पहिल्या सत्रात 7 आणि दुसऱ्या सत्रात 22)
कामकाज - 34.5 तास 
वाया गेलेला वेळ - एकूण 127 तास 45 मिनिट 

 

राज्यसभा 
बैठका - एकूण 30 
कामकाज - 44 तास 
वाया गेलेले तास - एकूण 121 तास 

किती प्रश्न विचारले गेले - दोन्ही सभागृहांमध्ये 580 प्रश्न विचारले गेले. 
लोकसभेत 17 आणि राज्यसभेत 19 प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. 

 

राहुल गांधी 2 तास उशिरा पोहोचले उपोषणाला...

दलितांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने सोमवारी देशभरात एक दिवसाचे उपोषण केले. सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी उपोषणाची वेळ ठरलेली असताना काही ठिकाणी 12 वाजता उपोषणाला सुरुवात झाली. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वतः 1 वाजता राजघाटावर पोहोचले होते. मुंबईत पाच वाजण्यापूर्वीच आंदोलन समाप्त करण्यात आले. उपवास आंदोलनाची ठिकठिकाणी ही वेगळी तऱ्हा असतानाच, दिल्लीत उपोषणाच्या आधी काँग्रेस नेत्यांनी छोले-भटोरेवर ताव मारल्याचे फोटो व्हायरल झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...