आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनने १७ दिवस आधीच पूर्ण देश व्यापला; पाऊस मात्र अजूनही सहा टक्के कमीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मान्सूनने शुक्रवारी संपूर्ण देश व्यापला. हवामान खात्यानुसार, मोसमी पाऊस आता पश्चिम राजस्थानच्या श्रीगंगानगरपर्यंत पोहोचला आहे. सामान्यपणे श्रीगंगानगरला १५ जुलै रोजी मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा १७ दिवस आधीच तो पोहोचला आहे. 


भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, मान्सून साधारणपणे १ जुलैपर्यंत संपूर्ण देशात मान्सून पोहोचत असला तरी पश्चिम राजस्थानचा काही भाग मात्र कोरडाच असतो. मात्र, यंदा वेळेपूर्वीच मान्सून या टोकापर्यंत पोहोचला आहे. 


मोसमी पावसाचा काळ १ जून ते ३० सप्टेंबर असा चार महिन्यांचा मानला जातो. या वर्षी केरळमध्ये नियोजित वेळेआधीच म्हणजे २९ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. चालू जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी त्याने व्यापली होती. 


दरम्यान, मोसमी पावसाचे ढग आणि काही भागांत पडत असलेल्या पावसामुळे उत्तर भारतात अनेक शहरांतील पारा शुक्रवारी उतरला. मात्र, उत्तर प्रदेशातील फतेहगडमध्ये उन्हाची तीव्रता कायम होती. या ठिकाणी शुक्रवारी देशातील सर्वाधिक ३९.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. 


पावसाचा अंदाज
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या चोवीस तासांत गुजरातसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र किनारपट्टी आणि तेलंगणा भागात गडगडाटासह पाऊस पडेल. पश्चिम उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...