आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारविरुद्ध चार वर्षांत प्रथमच अविश्वास ठराव; उद्या सभागृहात चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चार वर्षांपूर्वी केंद्रात स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध पहिला अविश्वास ठराव बुधवारी लोकसभेत मांडला जात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तेदेपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.

 

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी यावर तेदेपाचे (तेलुगू देसम पक्ष) के. के. श्रीनिवास यांना ठराव मांडण्याची परवानगी दिली. या ठरावावर शुक्रवारी दिवसभर चर्चा होईल. त्याच दिवशी मतदान घेतले जाईल. दरम्यान, या ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप काढला आहे. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी भाजपप्रणीत एनडीए हा ठराव जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. 

 

लोकसभेतील सदस्यांची संख्या

- एकट्या भाजपकडे २७४ खासदार (सभापतींसह). म्हणजे बहुमतापेक्षा अधिक. एनडीएचे खासदार एकत्र केले तर सदस्यसंख्या जाते ३१३ वर. मात्र, शिवसेनेच्या १८ खासदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.  

- यूपीएचे ६४, टीएमसी ३४, अण्णाद्रमुक ३७, तेदेपा १६, टीआरएस ११, माकप ९ व सपाचे ७ खासदार सरकारविरुद्ध.

 

 

बातम्या आणखी आहेत...