आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे 2000 आमदार, खासदारांचा देशभर उपवास; विरोधी पक्षांच्या विरोधात उपवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ न दिल्याच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या २००० पेक्षा जास्त आमदार, खासदारांनी देशभरात उपवास केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आमचा उपवास खरा आहे, छोले-भटुरे यांचा नाही. अमित शहांनी कर्नाटकच्या हुबळीत उपवास केला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत तर गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत उपवास केला. रविशंकर प्रसाद यांनी पाटण्यात, जावडेकर यांनी बंगळुरूत उपवास केला. भाजपने देशातील सर्व ६०० जिल्हा मुख्यालयांवर उपवास आणि धरणे आंदोलन केले.  

 

शहांचे तीन मठ, एक मंदिर, आश्रमात दर्शन  

भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुरुवारी २ दिवसांच्या दौऱ्यावर होते. सर्वात आधी ते धारवाडच्या लिंगायत समाजाच्या श्री सिद्धारूधा मठात गेले. त्यानंतर त्यांनी हुबळीत उपवास केला. ते पूज्य पुतेजाजा गवई आश्रम, वीर नारायणस्वामी मंदिर आणि हुबळीत मुरूसविरा मठातही गेले. त्यांनी हुबळीत एक रोड शोही केला.  

 

मोदींनी आपल्या खासदारांना केले आवाहन 
- मोदींनी बुधावारी भाजप खासदारांना आवाहन केले की, त्यांनी उपोषण करावे. ते म्हणाले, ' उद्या 12 एप्रिल आहे. 2014 मध्ये ज्या मुठभर लोकांना सत्ता मिळाली नाही, ते लोक देशाला पुढे जाऊ देत नाहीत. या लोकांना पराभव पचवता आलेला नाही, त्यामुळे त्यांनी एक दिवसही संसदेचे कामकाज चालु दिले नाही. त्यांच्या राजकीय अहंकारासाठी आणि त्यांची सत्तेची हाव लोकशाहीला मारक ठरत आहे. लोकशाही पायदळी तुडवण्याचा गुन्हा त्यांनी केला आहे. आमचे कर्तव्य आहे की त्यांचे हे कृत्य देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मी उद्या (गुरुवार) उपवास करणार आहे. माझे सर्व काम सुरु राहाणार आहे, परंतू मी उपवास करणार आहे. आपल्या सर्वांना आग्रह आहे की मोठ्या संख्येने लोकांना जमा करुन आपापल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात उपवास करुन देशाच्या संसदेला वेठीस धरणाऱ्यांना उघडे पाडा.'

 

खासदार, पक्ष नेत्यांवर जबाबदारी 
- पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते देशातील विविध भागात जाणार आहेत. हे लोक उपवास करुन विरोधी पक्षाने संसदेत काम कसे होऊ दिले नाही, हे सांगणार आहेत.  

 

शहर उपोषणाला कोण उपस्थित राहाणार
1. हुबळी अमित शाह
2. दिल्ली राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, सुरेश प्रभू, सुषमा स्वराज, मेनका गांधी आणि मीनाक्षी लेखी
3. वाराणसी जे.पी. नड्डा
4. पाटणा रविशंकर प्रसाद
5. चेन्नई निर्मला सीतारमण, विजय गोयल
6. बंगळुरु प्रकाश जावडेकर
7. विदिशा एम.जे. अकबर
8.तिरुअनंतपुरम के.जे. अल्फोंस
9. नोएडा महेश शर्मा
10. अजमेर भूपेंद्र यादव
11. मोतिहारी राधामोहन सिंह
12. इंदूर थावरचंद गहलोत
13. नवादा

गिरिराज सिंह

14. जींद चौधरी वीरेंद्र सिंह

 

हेही वाचा.. 

उपोषणांची नाटके (अग्रलेख)

 

18 वर्षात सर्वात कमी कामकाज

- यंदाच्या अधिवेशनात लोकसभेत एकूण 23% आणि राज्यसभेत 28% कामकाज झाले. याआधी 2000मध्ये लोकसभेची प्रोडक्टिव्हिटी 21% आणि राज्यसभेची 27% होती. 
- यावेळी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा, कावेरी प्रश्न, पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला नीरव मोदी या सारख्या मुद्द्यांवरुन काँग्रेस, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि दुसऱ्या विरोधीपक्षांनी गोंधळ घातला होता.

 

दोन्ही सभागृहांमध्ये 59 बैठका झाल्या, 78.5 तास कामकाज झाले

लोकसभा
बैठका- एकूण 29 (पहिल्या सत्रात 7 आणि दुसऱ्या सत्रात 22)
कामकाज- 34.5 तास 
वाया गेलेला वेळ - एकूण 127 तास 45 मिनिट

 

राज्यसभा
बैठका- एकूण 30 
कामकाज - 44 तास 
वाया गेलेले तास - एकूण 121 तास

किती प्रश्न विचारले गेले- दोन्ही सभागृहांमध्ये 580 प्रश्न विचारले गेले. 
लोकसभेत 17 आणि राज्यसभेत 19 प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...