आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांची दारे मुख्य प्रवाहातील शिक्षणासाठी खुली व्हावीत : मुख्तार नक्वी यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारला मदरशाची दारे बंद करण्याची मुळीच इच्छा नाही. मात्र मुख्य प्रवाहातील शिक्षणासाठी मदरशाची दारे खुली करायला हवी, असे आवाहन अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.


ब्रिज कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवारी एका कार्यक्रमात नक्वी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्राचे वाटप करण्यात आले. या समारंभात ते मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले, मदरशाची दारे मुख्य प्रवाहातील शिक्षणासाठी खुली झाली पाहिजेत. अल्पसंख्याक समुदायाला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वासही नक्वी यांनी व्यक्त केला. दरम्यान शिक्षणातील मुलींची गळती आधी ७० टक्के, तर आता ३५ टक्क्यांवर आली. २.६६ कोटी विद्यार्थी गरीब समुदायातील अाहेत. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तींच्या माध्यमातून हा लाभ झाला. अल्पसंख्याकांतील ५.४३ लाखाहून जास्त तरुणांना रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना ही संधी मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...