आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या सहा-सात दशकानंतर जेवढे काम झाले नाही, तेवढे 4 वर्षात सरकारने केले - मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी नमो अॅप द्वारे उज्ज्वला योजनेच्य लाभार्थी महिलांशी संवाद साधला. - Divya Marathi
मोदींनी नमो अॅप द्वारे उज्ज्वला योजनेच्य लाभार्थी महिलांशी संवाद साधला.

नवी दिल्ली -  स्वातंत्र्याच्या सहा-सात दशकानंतरही फक्त 13 कोटी कुटुंबाकडे एलपीजी कनेक्शन पोहोचले होते. आम्ही 4 वर्षांत 10 कोटी एलपीजी कनेक्शन दिले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधानांनी सोमवारी  उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांशी नमो अॅप द्वारे संवाद साधला. ते म्हणाले, 'स्वातंत्र्यांच्या 70     वर्षानंतर जेवढे काम झाले नाही तेवढे आम्ही केले आहे. ही योजना एवढी यशस्वी झाली आहे, की पीपीएल कुटुंबांपर्यंत एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य आता आठ कोटी करण्यात आले आहे.'
 

'धूर आणि स्टोव्हच्या त्रासातून महिलांची मुक्ती करायची'

- चुलीचा धूर आणि स्टोव्हच्या त्रासातून महिलांची मुक्ती करण्यासाठी एलपीजी कनेक्शनचे लक्ष्य वाढवण्यात आल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, उज्ज्वला योजनेचे यश पाहून पीपीएल कुटुंबांपर्यंत एलपीजी पोहोचवण्याचे लक्ष्य आठ कोटी करण्यात आले आहे. 
- मोदींनी यावेळी मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध 'ईदगाह' कथेतील हमिदचे उदाहरण दिले. ते म्हणाले, 'शाळेत गेलेल्या पिढीला मुन्शी प्रेमचंद यांची 'ईदगाह' ही कथा आठवत असेल. या कथेतील हमिद  जत्रेत स्वतःसाठी मिठाई न घेता, त्या पैशातून आजीसाठी चिमटा खरेदी करतो. स्वंयपाक करताना आजीचा हात पोळला नाही पाहिजे, ही भावना तो चिमटा घेण्यामागे असते. जर हमिद आपल्या आजीची एवढी चिंता करतो, तर मग देशाच्या पंतप्रधानांनी का करु नये.'

 

बातम्या आणखी आहेत...