आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेजारच्या तरुणांनी नवरदेवास बलात्काराचा व्हिडिओ दाखवून घडवला नववधूचा घटस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबाद- उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे सिव्हिल लाइन भागात शेजारच्या तरुणांनी तरुणीचे लग्न झाल्यानंतर दुस-याच दिवशी तिच्यावर केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ नवरदेव पतीला दाखवला. त्याचवेळी नववधू पत्नीने आपल्यावर बलात्कार करुन धमकी दिली व अश्लिल व्हिडिओ तयार केला अशी कबुली दिली. दरम्यान, त्यानंतर पतीने तिला लागलीच घटस्फोट दिला. 

 

सहायक पोलिस अधीक्षक अपर्णा गुप्ता यांनी शनिवारी सांगितले, बिशनपूर येथील एका तरुणीचे लग्न सिव्हिल लाइन भागातील एका तरुणाशी गेल्याच महिन्यात झाले होते. बिशनपूर येथील कुलदीप, सुनिल, विपीन तसेच संजीव हे सर्व तरुण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीच्या सासरी गेले. त्या तरुणीच्या पोटातील गर्भ माझाच असल्याचे त्यातील एकाने तिच्या पतीला सांगितले. तिला सोडून दे, असेही त्यांनी पतीस म्हटले.

 

पतीने पत्नीकडे याबाबत विचारणा केली असता, या तरुणानी आपल्यावर बलात्कार करुन धमकी दिली व अश्लिल व्हिडिओ तयार केला अशी कबुली दिली. पीडित तरुणीने आरोप केला की, हे तरुण तिची छेड काढत असत. विरोध केला तर चौघे जण तिच्या छोट्या भावास ठार मारण्याची धमकी देत होते. पित्याच्या मृत्यूनंतर तरुणी आई व दोन भावंडासोबत राहात होती. 

 

दरम्यान, पोलिसांनी या चार तरुणावर गुन्हा दाखल केला. पीडितेस जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. जानेवारी मध्ये तिच्या घरात शिरून या तरुणीवर बलात्कार केला. या घटनेचे मोबाइलवर चित्रण केले. यातूनच ती गर्भपती राहिली त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत होते. आता लग्नानंतरही तिच्या सासरी पोहचून पतीला तिच्यापासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले आहे.  

बातम्या आणखी आहेत...