आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत' नंतर 'अय्यारी' वादात, सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप मंजूरी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 'अय्यारी' सिनेमाला संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप घेतला असल्याची माहिती आहे. नीरज पांडे यांचा हा सिनेमा आहे. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे चित्रपटाची नियोजित रिलीज डेट पुढे ढकलावी लागत आहे, अशी शक्यता आहे. दरम्यान फिल्मची टीम ठिकठिकाणी प्रमोशन करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अय्यारी लष्कराच्या पार्श्वभूमीवरील सिनेमा आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने त्याच्या रिव्ह्यूची मागणी केली आहे.  

 

काय आहे फिल्ममध्ये
- मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला अय्यारी हा सिनेमा नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केला आहे. 
- नीरज पांडे यांनी याआधी बेबी आणि 'अ वेन्सडे' सारखे चित्रपट बनवले आहेत. 
- अय्यारी ही फिल्म दोन जिद्दी आर्मी ऑफिसरची आहे. त्यांचे विचार कधीही जुळत नाही, मात्र ते आपापाल्या ठिकाणी योग्य असतात. गुरु-शिष्याच्या नात्यावरील ही फिल्म असल्याचे म्हटले जाते. 

बातम्या आणखी आहेत...