आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्या मुलाखती नैराश्यातून : विजय गोयल यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने राहुल गांधी एवढे निराश झाले आहेत की त्यांनी निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्याच्या एक दिवस आधी माध्यमांना मुलाखती देऊन निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी टीका भाजपने केली आहे. 


पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री विजय गोयल म्हणाले की, राहुल गांधी यांच्या मुलाखतीनंतर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. गुजरातमध्ये अंत:प्रवाह वाहत आहे, असे राहुल गांधी म्हणत आहेत. हा अंत:प्रवाह काँग्रेसच्या विरोधात काम करेल आणि भाजप १८२ पैकी १५० जागांवर विजयी होईल. 


गोयल म्हणाले की, काँग्रेस पक्ष भयभीत आहे आणि राहुल गांधी निराश आहेत. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून मुलाखती दिल्या आहेत. निवडणुकीच्या ४८ तास आधी अशा मुलाखतींना परवानगी देऊ नये, असे आम्हाला वाटते. आम्ही कधीही अशा मुलाखती दिल्या नाहीत. आम्ही या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ९ डिसेंबरला पार पडला. आता १४ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. १४ जिल्ह्यांतील ९३ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी २ कोटी २२ लाख मतदार असून त्यापैकी १.०७ कोटी महिला मतदार आहेत. निकाल १८ डिसेंबरला जाहीर होईल. भाजप गुजरातमध्ये पुन्हा सत्तारूढ होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हिमाचल प्रदेशमध्येही विधानसभा निवडणूक झाली असून तेथील निकालही १८ डिसेंबरलाच जाहीर होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...