आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कचऱ्यामुळे माती, हवा, पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी10 टन ई-कचऱ्यावर केली पुनर्प्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील रहिवासी अक्षय जैन यांनी लंडनमधील ग्रीनविच विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. यूकेतील नोकरी सोडून भारतात परतले व ई-कचरा पुनर्प्रक्रियेच्या कामाला सुरुवात केली. युरोपमध्ये लॅपटॉप, फोन, कॅल्क्युलेटर, बॅटरी, रिमोटसारख्या ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगळी यंत्रणा असल्याचे त्यांनी पाहिले होते. परंतु भारतात अशी यंत्रणा नव्हती. त्यामुळे येथे या कामाला सुरुवात करण्याची कल्पना सुचली.   

 

भारतात ई-वेस्ट व इतर कचरा डस्टबिनमध्ये टाकला जातो. ही बाब अक्षय यांना खटकत होती. त्यामुळे २०१६ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘नमो’ ई-वेस्ट मॅनेजमेंट स्टार्टअप सुरू केले. या ‘नमो’चा अर्थ नरेंद्र मोदी नसून जैन धर्मातील मंत्र ‘णमो’ (नमस्कार) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अक्षय यांच्या फरिदाबादेतील प्लँटमध्ये रोज १० टन ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी सुमारे ८,५०० टन ई-वेस्टवर पुनर्प्रक्रिया केली.

 

यात एक लाखांहून अधिक लॅपटॉप, ८० हजार मोबाइल फोन आणि दोन लाख इतर घरगुती वापरातील उपकरणांचा समावेश आहे.वर्षभरापूर्वी देशात ५% ई-वेस्टवर प्रक्रिया होत होती. परंतु सरकारने ई-वेस्टवर नवीन धोरण आखल्यापासून १०% पर्यंत पुनर्प्रक्रिया होत आहे. ई-कचऱ्यामुळे माती, हवा, पाणी प्रदूषित होते. अक्षयच्या प्लँटवर कंपन्यांचा ई-वेस्ट रिसायकलिंगसाठी येतो. अक्षयने युजर्सकडून ई-कचरा गोळा करण्यासाठी वेबसाइट सुरू केली आहे. यात ७१ प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची यादी दिली आहे.  

 

अक्षयच्या प्लँटमध्ये ७१ प्रकारच्या वस्तूंवर होते पुनर्प्रक्रिया   
अक्षय म्हणाले की, ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून आम्ही पुन्हा त्याला वापरण्यायोग्य बनवतो. ई-कचऱ्यातून कॉपर, स्टील, ब्रास, अॅल्युमिनियम, लोखंड, झिंक आणि प्लास्टिक वेगळे केले जाते. शिसे, पारा, फॉस्फरस, गंधक, आर्सेनिक, कॅडमियमसारख्या धोकादायक वस्तूंना वेगळे करून सरकारने ठरवून दिलेल्या साइटवर साठवले जाते. सध्या सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियमसारखे मौल्यवान घटक वेगळे करण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही.   

बातम्या आणखी आहेत...