आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसबंदीची सुविधा होत नाही, तोपर्यंत चावा घेऊ नका असे माकडांना सांगावे काय: कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  जोपर्यंत सरकार नसबंदीची पद्धत शोधून काढू शकत नाही, तोपर्यंत प्रजनन करू नका अथवा लोकांचा चावा घेऊ नका, असे आम्ही त्यांना सांगावे काय? , अशी खोचक टिप्पणी माकडे आणि भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्याच्या मागणीसंदर्भात उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. न्यायाधीश गीता मित्तल व न्यायाधीश सी.   हरीशंकर यांच्या पीठासमोर सरकारी वकिलाने म्हटले, नसबंदीसाठी अमेरिकेतून लस आणली आहे. पण त्याची चाचणी घेणे बाकी आहे. 


चाचणीस मंजुरी मिळाल्याशिवाय लशीचा वापर करता येत नाही. या लशीचा वापर घोड्यांची नसबंदी करण्यासाठी केला जात होता. आपल्या देशात माकडांवर याचा वापर करण्यात आलेला नाही. यावर न्यायालय म्हणाले, प्रकरण २०११ पासून न्यायालयात आहे आणि केंद्र सरकार अद्याप नसबंदीचे तंत्र विकसित करू शकले नाही.  

 

न्यायालयाचे आदेश :  ३ दिवसांत मंजुरी घ्या आणि ४ आठवड्यांत केंद्र सरकारने प्रक्रिया पूर्ण कराव्यात

न्यायालयाने या मुद्द्यावर नेमलेल्या समितीस त्वरित बैठक घेण्याचे आणि या समस्येवर काम करण्यासाठी कालावधी ठरवण्याचे आदेश दिले. न्यायालय म्हणाले, एनजीओ व वाइल्डलाइफ एसओएस आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआयआय)चे एक एक सदस्य या पॅनलवर असतील. माकडांच्या नसबंदीसाठी एक प्रस्तावित प्रकल्प तयार करून ते केंद्राकडे पाठवतील. डब्ल्यूआयआयने तीन दिवसांत आवश्यक मंजुरी घ्याव्यात. नंतर केंद्राने चार आठवड्यात यावर सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात.  या प्रकरणाची सुनावणी ३१ मे रोजी ठेवण्यात आली.

 

एक महिन्यानंतरही कुत्र्यांच्या नसबंदीसाठी जागा शोधणारी समिती न नेमल्याने कोर्टाची नाराजी  

आदेश देऊन एक महिना उलटला तरी दिल्ली सरकारकडून कुत्र्यांच्या नसबंदीसाठी एक केंद्र उभारण्यासाठी जागा शोधण्यासाठी समिती स्थापन न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. २४ एप्रिल रोजी न्यायालयाने दिल्लीतील ७७ रुग्णालयांची पाहणी करून जागा शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. पीठाने म्हटले, जर समिती नसबंदी केंद्रासाठी जागा मिळाली तर न्यायालयाच्या आदेशाशिवाय केंद्राची ताबडतोब  सुरुवात करावी. सरकारने म्हटले, आम्ही लवकरच समिती स्थापन करू. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...