आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मार्गदर्शकास राहुल गांधींचे \'मार्ग\'दर्शन; संसद परिसरात सत्ताधारी, विराेधक एकत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्‍ली- गुजरातमध्ये मंगळवारी निवडणूक प्रचार संपला. बुधवारी संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली. या वेळी भाजप व काँग्रेसचे अनेक माेठे नेते संसद भवन परिसरात शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित हाेते. त्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमाेहनसिंग, साेनिया गांधी अादींचा समावेश हाेता. यादरम्यान पंतप्रधान माेदी यांनी मनमाेहनसिंग यांच्याशी हस्तांदाेलन केले. या वेळी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकजूट दिसून अाली. राहुल गांधी हे अडवाणी यांना पुढे उभे राहण्याबाबत सांगताना दिसले.
बातम्या आणखी आहेत...