आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षी 8 सरकारी कंपन्यांचे आयपीआे; हिंदुस्तान एरोनॉटिक्स व राइट्स लिमिटेडही सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आगामी अार्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये आठ सरकारी कंपन्या आयपीआेच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश करणार आहेत. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व राइट्स लिमिटेडही सहभागी आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.


गुंतवणूक व सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव नीरज गुप्ता म्हणाले, या आठही सरकारी कंपन्यांच्या आयपीआे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कंपन्या योग्यवेळी भांडवली बाजारात प्रवेश करतील. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स आयपीआे आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची अगोदरच मंजुरी आहे.  कंपनीचा १० टक्के भाग विक्री करण्याची सरकारची योजना आहे. राइट्स, आयआरइडीए, भारत डायनॉमिक्स, मिश्र धातू निगम लिमिटेडचे आयपीआेसाठी मसुदा सेबीला पाठवण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...