आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Emotional:आई..झोपेत कोणीतरी माझ्या शरीराचे लचके तोडतात.. निर्भयाची पत्रे वाचून बसतो हादरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीमध्ये 16 डिसेंबर 2012 च्या रात्री घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण देश हादरा होता. या घटनेतील आरोपींची फाशी कायम राहणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. 


या घटनेनंतर मृत्यूने निर्भयाला कवेत घेतले होते. पण त्याआधी निर्भयाने मृत्यूलाही अनेक दिवस झुंजवले होते. मृत्यूशी हा संघर्ष सुरू असताना कोमात जाण्यापूर्वी निर्भयाने तिच्या आईला काही पत्रं लिहिली होती. नंतर माध्यमांमध्ये ही पत्रे समोर आली होती. या पक्षातून तिच्या वेदना, भावना आणि तिच्या मनात तेव्हा काय सुरू होते, हे समोर येते. चला जाणून घेऊयात काय लिहिलेले होते या पत्रांमध्ये. 


पहिले पत्र 
निर्भयाने 19 डिसेंबर 2012 रोजी आईला पहिले पत्र लिहिले. तिला आईला तिच्या वेदना सांगायच्या होत्या. निर्भया लिहिते, आई मला खूप वेदना होत आहेत. मला आता या वेदना सहन होत नाहीत. लोकांच्या वेदना दूर करता याव्या म्हणून, लहानपणापासून मला डॉक्टर बनायचे होते. पण मला हे माहिती नव्हते की, मलाच अशा वेदना सहन कराव्या लागतील. डॉक्टरांच्या औषधांनीही माझ्या वेदना कमी होत नाहीत. मी या वेदना आता सहन करू शकत नाही. 


दुसरे पत्र 
निर्भयाने दुसरे पत्र लिहिले, 21 डिसेंबर 2012 रोजी. तिने आईला लिहिले, वेदनांमुळे मला नीट श्वासही घेता येत नाहीये. डॉक्टरांना सांग मला झोपेचे औषध देऊ नका, कारण मी झोपले की कोणीतरी माझ्या शरिराचे लचके तोडत असते. मी हतबल असते. झोपेत मला काय समजते, मलाही माहिती नाही. माझ्या आसपासचे सर्व आरसे फोडा, मला स्वतःचा चेहरा पाहायचा नाही. 


तिसरे पत्र 
22 दिसेंबर 2012 च्या पत्रात निर्भया आईला म्हणते, मला अंघोळ करायची आहे. माझ्या शरिरातून त्या जनावरांच्या शरिराचा वास येतोय. मला स्वतःच्या शरिरावर चीड येत आहे. मला सोडून जाऊ नकोस आई, मला एकटीला भिती वाटते. 


चौथे पत्र 
निर्भयाने 23 डिसेंबर 2012 च्या पक्षात आईला चौथे पत्र लिहिले. ती विचारते, आई बाबा कुठे आहेत? ते मला भेटायला का नाही येत? बाबाला वाईच वाटून घेऊ नका, असे सांग. 


पाचवे पत्र 
निर्भयाने पाचव्या पत्रात तिच्या आईला लिहिले, आई त्या जनावरांना सोडू नकोस. कोणालाही माफ करायचे नाही. या पत्रात तिने तिच्या मित्रांची विचारपूसही केली. 


अखेरचे पत्र 
26 डिसेंबर 2012 ला निर्भयाने अखेरचे पत्र लिहिले. तिने लिहिले, आई मला आता वेदना सहन होत नाहीत. मी वदेना सहन करून करून थकले आहे. खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांना मला औषध द्यायला सांग ना. मी खरंच खूप थकले आहे. आई मला माफ कर. 


यानंतर निर्भया कोमामध्ये गेली. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...