आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल सॉफ्टवेअरमध्ये प्रथमच एका भाषेची अडचण, तेलगू अक्षराने आयफोन होतो आहे क्रॅश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभर आपले तंत्रज्ञान आणि नवोन्मेषामुळे प्रसिद्ध असलेल्या अॅपलसमोर सध्या एका भारतीय भाषेतील अक्षराने आव्हान उभे केले आहे. अॅपलच्या लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेटमध्ये एक गोंधळ निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आयफोन आणि आयपॅडचा यूजर्स डेटा क्रॅश होत आहे. विशेष हे की हा प्रकार तेलगूतील एका अक्षरावरून घडला आहे. मराठीत याचा अर्थ ‘ज्ञ’ असल्याचे सांगितले जाते. हे अक्षर असलेला कोणताही टेक्स्ट मेसेज लोड करण्याच्या प्रयत्नात मोबाइल आणि अॅप क्रॅश होत आहेत. याचा परिणाम आय-मेसेजशिवाय सफारी, व्हाॅट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि टेक्स्ट मेसेज स्वीकारणाऱ्या इतर अॅपवरही होत आहे. ‘द व्हर्ज’ वेबसाइटनुसार आयओएस-११ वर चालणाऱ्या अॅपल मोबाइलवर यूजर्स जेव्हा हे अक्षर टाइप करतात किंवा दुसरा युजर एखाद्या अॅपने तो शब्द पाठवतो तेव्हा अॅपल फोनमध्ये तो मेसेज ओपन करताच मोबाइल क्रॅश होतो. आयओएस-११ वरील अनेक अॅप या एका अक्षरामुळे बंद पडले आहेत. सर्वाधिक परिणाम व्हाॅट्सअॅप, फेसबुक, जी-मेलसारख्या अॅपवर झाला आहे. मेसेज येताच आय-मेसेज अॅप क्रॅश होत आहे. तो ओपन करण्यासाठी दुसऱ्या अॅपचा पर्याय सॉफ्टवेअर देत असले तरी दुसऱ्या अॅपमध्ये ते ओपन करताच ते अॅपही क्रॅश किंवा फ्रीज होत आहे. 

 

अॅपलच्या सर्वच प्रॉडक्टमध्ये समस्या

अॅपलनुसार, ही तक्रार त्यांच्या आयओएस-११, मॅक ओएसआय सिएरा, वॉचओएस-४ आणि टीव्हीओएस-११ व्हर्जनमध्ये येत आहे. ही अडचण लवकर सोडवण्यासाठी कंपनी प्रयत्नरत आहे. एखाद्या भाषेतील अक्षरामुळे या प्रकारची अडचण निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अॅपलने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...