आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : वृक्षतोड कारवाई १० दिवस थांबवण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत १६ हजार वृक्षांची कत्तल करण्यास १० दिवसांची रोख लावण्यात आली. हायकोर्टाचा वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्याचा विचार होता. पण कोर्टाचा कल पाहून राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळाने (एनबीसीसी) ४ जुलैच्या सुनावणीपर्यंत वृक्षतोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दक्षिण दिल्लीतील ६ वसाहतींना वसवण्यासाठी वृक्षांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


वृक्षतोडीवर सोमवारी दिल्ली हायकोर्टाने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, '१६ हजार वृक्षांना नष्ट करणे दिल्लीला परवडणारे आहे का? रस्ता रुंदीकरणाचे काम असेल तर एकवेळ समजू शकले असते.' वसाहतीचे काम पाहणाऱ्या एनबीसीसीने वृक्ष प्राधिकरणाकडून वृक्षतोडीची परवानगी मिळाल्याचा दावा केला. दुसरीकडे २ जुलै रोजी एनजीटीमध्ये अशाच एका प्रकरणावर सुनावणी होईल. वृक्षांना वाचवण्यासाठी ४५ वर्षांनंतर पुन्हा चिपको आंदोलन सुरू झाले. १९७३ मध्ये उत्तराखंडमधील (तेव्हाचा उत्तर प्रदेश) आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीतही शुक्रवारी आंदोलन झाले. हजारो लोकांनी झाडांना मिठी मारली. दिल्ली वन विभागानुसार राजधानीत लोकसंख्येच्या तुलनेत ९ लाख वृ़क्ष कमी आहेत व ६ वर्षांत ५२ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली.


१६ हजार वृक्षांमुळे रोज १५ हजार जणांना श्वास घेणे शक्य 
- एक वृक्ष वर्षात सरासरी २६० पाउंड ऑक्सिजन देतो. १६ हजार वृक्ष ४२ लाख पाउंड ऑक्सिजन देतात. 
- या ऑक्सिजनमुळे दररोज अंदाजे १५ हजार लोकांना श्वास घेता येऊ शकतो. 
- दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, एक डौलदार वृक्ष २ लोकांना संपूर्ण आयुष्य ऑक्सिजन देऊ शकतो. 
- झाडांच्या मोबदल्यात वृक्षारोपण पर्याय नाही. रोपट्याचे झाडात रूपांतर होण्यास ७ त ८ वर्षे लागतात. - वृक्षाच्या पूर्ण वाढीसाठी २५ वर्षे लागतात. 

बातम्या आणखी आहेत...