Home | National | Delhi | padma awards declared 2018

डाॅ. गंगाधर पानतावणे, बंग दांपत्यासह महाराष्ट्रातील 11 मान्यवरांना पद्म सन्मान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 26, 2018, 03:05 AM IST

भारत सरकारकडून गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात संगीतकार इलैयाराजा, प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद

 • padma awards declared 2018
  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे

  नवी दिल्ली- भारत सरकारकडून गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात संगीतकार इलैयाराजा, प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि केरळचे तत्त्वचिंतक परमेश्वरन परमेश्वरन यांना २०१८ सालचा पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला. परमेश्वरन हे संघप्रचारकही अाहेत. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, महाराष्ट्रातील सतारवादक अरविंद पारीख यांच्यासह ९ जणांना पद्मभूषण व ७३ मान्यवरांचा पद्मश्रीने सन्मान हाेईल. पद्मश्री मिळवणाऱ्यांत महाराष्ट्रातून ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग, पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर, समाजसेवक संपत रामटेके (मरणोत्तर) , प्रख्यात शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक शिशिर पुरुषोत्तम मिश्रा यांचा समावेश आहे.

  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे
  दलित चळवळीतील अस्मितादर्श या त्रैमासिकाचे पाच दशकांहून अधिक काळ संपादक. दलित वैचारिक वाङ‌्मय, अर्थ व अन्वयार्थ हे समीक्षात्मक ग्रंथ, लेणी, स्मृतिशेष ही व्यक्तिचित्रे, दुसऱ्या पिढीचे मनोगत, विद्रोहाचे पाणी पेटते आहे, वादळाचे वंशज आदी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. २००९ मध्ये अमेरिकेच्या सॅन होजेतील पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

  डॉ. अभय व राणी बंग : ३० हून जास्त वर्षे गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवली. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर. ‘आशा’ कार्यक्रम राबवला. भारत सरकारने नंतर तो अंगीकारला.

  संपत रामटेके : १९९१ पासून सिकलसेल आजारावर जनजागृती. वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना त्यांनी आजारावर अभ्यास करून जागरूकता निर्माण केली. ते सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष. नोव्हेंबर २०१७ मध्ये निधन.

  अरविंद गुप्ता : टाकाऊतून खेळणी तयार करून वैज्ञानिक प्रयोग देशातील मुलांपर्यंत पोहोचवले. चार दशकांत ३ हजारांवर शाळांत भेटी दिल्या. टाकाऊ वस्तूंमधून खेळण्यांची निर्मिती करणारे १८ भाषांतील ६,२०० लघुपट त्यांनी तयार केले.

  मुरलीकांत पेटकर : १९६५ मधील भारत-पााक युद्धात मणक्यात गोळी लागली, एक हातही गमावला.जर्मनीत १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये ५० मी.फ्रीस्टाइलमध्ये ३७.३३ सेकंदांच्या विश्वविक्रमासह भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 • padma awards declared 2018
  डॉ. अभय व राणी बंग
 • padma awards declared 2018
  मुरलीकांत पेटकर
 • padma awards declared 2018
  संपत रामटेके
 • padma awards declared 2018

Trending