आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत वाद : शाळेच्या बसववर हल्ला करणाऱ्या 18 आरोपींची 14 दिवसांसाठी तुरुंगात रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - पद्मावतच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवत असताना बुधवारी एका शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. या बसमध्ये लहान लहान मुले होती. या प्रकरणात 18 जणांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


केव्हा केला हल्ला...
- पद्मावत चित्रपटाच्या विरोधात बुधवारी गुडगावमध्ये आंदोलन सुरू होते. त्यावेळी सायंकाळी गुडगाव-सोहना रोडवर एका बसमधून प्रवाशांना खाली उतरवून तिची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर ती बस जाळण्यात आली. त्यावेळी जवळपास 4 तास वाहतुकीची कोंडी झालेली होती. 
- पोलिसांनी जेव्हा आंदोलकांना पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत जीडी गोयंका स्कूलची एक बस अडकली होती. आंदोलकांनी जवळपास 10 मिनिटे दगडफेक केली. 
- 60 आंदोलकांनी बसला घेराव घातला. त्यांच्या हातात काठ्याही होत्या. आंदोलकांनी ड्रायव्हरला बस थांबवण्यास सांगितले. ड्रायव्हरने बस थांबवली नाही तेव्हा तिच्यावर दगडफेक करण्यात आली. 
- बसमधील स्टाफने मुलांना हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून खाली सीटमागे वाकण्यास सांगितले. मुलांच्या सुरक्षेसाठी ड्रायव्हरने बस थांबवली नाही. 
- सुदैवाने यात मुले जखमी झाली नाहीत पण ती सर्व प्रचंड घाबरलेली होती. 


18 जणांना अटक 
पोलिसांनी या प्रकरणामध्ये 18 जणांना ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्यांना सोहना येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...