आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट सेशन : नोएडा फेक एन्काऊंटरवरुन राज्यसभेत गदारोळ, कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी फेक एन्काऊंटर मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. - Divya Marathi
सोमवारी फेक एन्काऊंटर मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला.

नवी दिल्ली - राज्यसभेत सोमवारी नोएडा येथील बनावट एन्काऊंटवरुन गदारोळ झाला. समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी बनावट एन्काऊंटर प्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्तावासाठी नोटीस दिली होती. राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा आज राज्यसभेत त्यांचे पहिले भाषण देणार होते. दुसरीकडे, काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षणाच्या मुद्द्यावर नोटीस दिली होती. 

 

मागील अधिवेशनातही बोलू शकले नाही शहा 
- अमित शहा यांना मागील अधिवेशनात जीएसटीवर बोलायचे होते, मात्र तीन तलाक विधेयकावर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. 
- त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले होते, शहा प्रथमच सभागृहात बोलणार होते. मात्र विरोधकांच्या गदारोळामुले त्यांना संधी मिळाली नाही. 

 

काय आहे नोएडा एन्काऊंटर
- नोएडा मधील सेक्टर 122 येथे शनिवारी रात्री चौकशी दरम्यान झालेल्या बोलचालीवरुन उप निरीक्षकाने जिम ट्रेनर जितेंद्र यादव याच्यावर गोळीबार केला.
- त्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 
- पीडित यादवच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे, की पोलिसांनी याला एन्काऊंटर म्हटले असले तरी हे प्रकरण बनावट आहे. 
- रविवारी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पोलिस अधीक्षक लवकुमार म्हणाले, की हे एन्काऊंटर नाही. हॉस्पिटलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 
- लव कुमार म्हणाले, हा दोघांचा आपसातील वाद होता. तपासात समोर आले की सेक्टर 122 मध्ये ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याच्या मोठ्या भावाला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक ओळखत होता. 
- पोलिस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे, त्याच्यासह आणखी 3 पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...