आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीपेक्षा पकोडे विकणे चांगले- शहा; 10 कोटी नोकऱ्यांचे काय झाले? : आझाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अाभार प्रस्तावावर चर्चा झाली. संसदेत पहिल्यांदाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाषण केले. तासाभराच्या भाषणात त्यांनी सरकारी कामे व योजनांचा आढावा घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पलटवार करत उत्तर दिले आणि प्रश्न विचारले.

 

 

अमित शहा यांचे ७० मिनिटे भाषण

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत पहिल्यांदाच चर्चेत भाग घेतला. ७० मिनिटांच्या भाषणात शहा यांनी जीएसटी, बेरोजगारी, शेतकरी, गरीब, महिला, सर्जिकल स्ट्राइक, काश्मीर व तिहेरी तलाक याचा उल्लेख केला. विरोधकांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले, मला सहा वर्षे ऐकावे लागले, तुम्ही मला अडवू शकत नाहीत. चिदंबरम यांच्या टि्वटचा उल्लेख करत म्हणाले, पकोडा विकणे लाजिरवाणी बाब नाही, बेरोजगारीपेक्षा ते चांगले आहे.  

 

शहा यांचे ४ मुद्दे : शास्त्रींशी मोदींची तुलना

३१ कोटी खाती उघडली 
शहा म्हणाले, मोदी, गांधी व दीनदयाल उपाध्याय यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ५५ वर्षांपासून एकच पक्ष व एकाच कुटुंबाचे सरकार राहिले. मात्र, ६०% कुटुंबांचे  बँक खाते नव्हते. अाम्ही ३१ कोटी बँक खाती उघडली. ७३ हजार कोटी रुपये या खात्यात आहेत.

  
८ कोटी गॅस जोडण्या देऊ 
 लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानच्या युद्धावेळी व्रत ठेवण्याचे आवाहन केले होते. आता पंतप्रधान मोदी यांनी श्रीमंतांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले आहे. उज्ज्वला योजनेत ५ कोटी महिलांना गॅस जोडण्या दिल्या. आता ८ कोटी गॅस जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.  


प्रत्येक घरात शौचालय

  शौचालय अभियान स्वच्छतेशी जोडले आहे. १६ वर्षांची गरीब मुलगी प्रातर्विधीसाठी भरवस्तीतून जाते तेव्हा तिचा आत्मविश्वास खचताे. आम्ही २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शौचालय बांधणार आहोत. आम्ही हमीभाव दीडपट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. युरियाला  नीम कोटिंग केले.  


एकत्र निवडणूक व्हावी

घराणेशाही, जातीयवाद व तुष्टीकरण या तीन बाबी भारतीय लोकशाहीला दंश करतात. आमच्या पंतप्रधानांनी यापासून लोकशाहीला मुक्त केले. देशातील ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंतच्या सर्व निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात. यावर सविस्तर चर्चा व्हावयास हवी.

 

१० कोटी नोकऱ्यांचे काय झाले? : आझाद  

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, सरकार केवळ यूपीए सरकारच्या योजनांचे नाव बदलून वाहवा मिळवत आहे. सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला असा भारत नको. आम्हाला जुना भारत परत द्या. सरकार विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करत आहे. सरकारने संपूर्ण विरोधी पक्षांना दहशतवादी बनवले आहे. आमच्या वेळी दहशतवाद्यांचे फोन टॅप केले जात होते. आज आमचे फोन टॅप केले जात आहेत. 

 

आझादांचे ४ मुद्दे : १५ लाख रु. कुठे गेले?  

 गेमचेंजर नव्हे, नेमचेंजर : 
आझाद म्हणाले, १९८५ पासून काँग्रेसच्या काळात जेवढ्या योजना तयार झाल्या त्यांची नावे बदलून पुन्हा सुरू केल्या जात आहेत. तुम्ही प्रत्येक योजना सुरू करताना आमचे सरकार गेमचेंजर असल्याचे सांगता. मी म्हणतो, गेमचेंजर नव्हे, नेमचेंजर आहे. ५ वर्षे उद््घाटन करणार असाल तर तेही करू शकणार नाहीत.  


असा भारत नको : 
बेटी बचाओ बेटी पढाओची घोषणा दिली जात आहे. मात्र, भाजपशासित राज्य, विशेषत: हरियाणा तर बलात्काराचा गड झाला आहे. ८ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे पहिल्यांदाच ऐकत आहे. हा कोणता भारत तयार होत आहे?  


पेट्रोलचे भाव आकाशाला भिडले :

२०१४ मध्ये १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा राष्ट्रपतींच्या भाषणात उल्लेख नाही. तरुण काम मागत आहेत. १० कोटी नोकऱ्या देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते त्याचा उल्लेख नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर  गगनाला भिडले आहेत. असे आमच्या वेळी झाले असते तर आम्ही क्रांती आणली असती.  


रिपॅकेजिंग येत नाही : 
सरकारने जनधनमध्ये उघडलेल्या खात्यांच्या संख्येसाठी यूपीए सरकारला श्रेय दिले नाही. यूपीए सरकारमध्ये २५ कोटी खाती उघडली. तुमच्या सरकारने ७ कोटी खाती उघडली. आम्हाला रिपॅकेजिंग येत नाही. भाजपकडे १६००० पट नफ्याची योजना आहे.  

 

 

पंतप्रधान मोदींनी सीएम असताना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले : सिद्धरामय्या  

कर्नाटकचे मुख्यमंत्री पी. सिद्धरामय्या यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरूतील सभेत केलेल्या आरोपाला उत्तर दिले. ते म्हणाले, पंतप्रधानांना भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वत: लोकायुक्ताची नियुक्ती केली नव्हती. ते भ्रष्टाचार सुकर करत आहेत. त्यांच्या काळात गोध्रात २००० लोक मारले गेले होते. अमित शहा हत्या प्रकरणात सहभागी राहिलेले आहेत. बी. एस. येदियुरप्पा तुरुंगात जाऊन आले आहेत. पंतप्रधानांनी खोटे आरोप करून कन्नडांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे.

बातम्या आणखी आहेत...