आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Participate In Clean India Internship At Summer Vacations; Appeal To Modi\'s Youth

उन्हाळी सुट्यांत स्वच्छ भारत इंटर्नशिपमध्ये सहभागी व्हा; मोदी यांचे तरुणांना आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उन्हाळी सुट्यांमध्ये तरुणांनी स्वच्छ भारत इंटर्नशिप-२०१८ कार्यक्रमात सहभागी व्हावे. उत्तमरीत्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून क्रेडिट पॉइंट दिले जातील. शिवाय चांगले काम करणारे विद्यार्थी, महाविद्यालय आणि विद्यापीठांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते ४३ व्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात ते बोलत होते.


चार मंत्रालयांनी एकत्र येऊन इंटर्नशिप सुरू केली असून यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुण मंडळी माय गव्हर्नमेंट अॅपवर जाऊन यासाठी नोंदणी करू शकतात. मोदी म्हणाले की, तरुणांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेला “जय विज्ञान’चा मंत्र आत्मसात करावा आणि आधुनिक सशक्त आणि समर्थ भारताच्या निर्माणासाठी योगदान द्यावे. २० वर्षांपूर्वी १९९८ मध्ये ११ मेच्या दिवशी वाजपेयी यांच्या नेतृत्वातच अणुचाचणी यशस्वी झाली होती.  


 मोदी म्हणाले की, बौद्ध पर्यटनासाठी केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर भर देणार आहे. 
या अंतर्गत देशातील महत्त्वाच्या बौद्ध पर्यटन स्थळांना दक्षिण-पूर्व आशियाशी जोडले जाईल. बौद्ध धर्माने भारताला चीन, जपान, कोरिया, थायलँड, कंबोडिया आणि म्यानमारसारख्या अनेक आशियाई देशांशी जोडले आहे. 


पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छाही मोदींनी दिल्या.
खेळाडूंनी पदक जिंकणे देशासाठी गौरवास्पद : मोदी यांनी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीचे कौतुक केले. पदक जिंकणे खेळाडूंसाठी गर्व आणि अभिमानाची गोष्ट असते. पण आपल्या देशासाठी तो अत्यंत गौरवास्पद क्षण आहे.

 

रमजानमध्ये दानाचे महत्त्व

माेदी म्हणाले, ‘रमजानचा हा पवित्र महिना अतिशय श्रद्धेने साजरा केला जाताे. माेहंमद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे या निमित्ताने अनुकरण करायला हवे. त्यांनी समानता व बंधुभावाची दिलेली शिकवण अंगीकारण्याची गरज अाहे. एकदा पैगंबरांना विचारण्यात अाले ‘इस्लाम धर्मात काेणते कार्य महत्त्वाचे मानले जाते?’ त्यावर पैगंबर म्हणाले, ‘गरजूंची भूक भागवणे व सर्वांसाेबत प्रेमाने, समंजसपणे वागणे हेच महत्त्वाचे अाहे.’ अापल्याजवळ गरजेपेक्षा जास्त असलेल्या वस्तूंचे गरजूंना दान करावेे, अशी त्यांची शिकवण अाहे. म्हणूनच रमजान महिन्यात दानाचे महत्त्व अाहे, असे माेदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...