आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलच्या दराने गाठली 55 महिन्यांतील उच्चांकी पातळी, डिझेलचा दर विक्रमी पातळीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर वाढल्याने भारतात पेट्रोलच्या दराने पाच वर्षांतील उच्चांक गाठला. तर डिझेलचा दर आजवरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ८१.९३ रुपये तर डिझेल ६९.५४ रुपये झाले.


१६ जूनपासून या इंधन तेलाचे दर क्रूड तेलाच्या दरानुसार रोज निश्चित केले जात आहेत. त्यानुसार इंधन तेलाने हा उच्चांक गाठला. या वर्षात पेट्रोल ४ रुपये तर डिझेल ६ रुपयांनी महागले आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून पेट्रोल ५० पैशांनी तर डिझेल ९० पैशांनी महागले आहे. भारतात पेट्रोलचा सर्वात महागडा दर मराठवाड्यात परभणीमध्ये असतो. या वाढीमुळे परभणीत पेट्रोल ८३.५५ रुपये झाले. आगामी काळात इंधन तेलाचे दर ९० रुपयांवर जातील, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती.

 

कच्चे तेल ५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर

जागतिक बाजारात शुक्रवारी ब्रँट क्रूड आॅइल ७३.५६ रुपये प्रति बॅरल होते. २०१३च्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. दरम्यान, अमेरिका व युरोपियन युनियनच्या वतीने इराणवर लावले जाणारे संभाव्य निर्बंध, सिरियातील युद्धजन्य स्थिती यामुळे आगामी काळात दर आणखी वाढू शकतात.

 

पेट्रोलचे चार महानगरांतील सध्याचे दर 
दिल्ली 74.08 रुपये लीटर 

कोलकाता 76.78 रुपये लीटर 

मुंबई 81.93 रुपये लीटर 

चेन्नई 76.85 रुपये लीटर 

 

यावर्षाचा आढावा घेतला तर 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे. 
1 जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचे दर 


शहर  पेट्रोल (रुपये प्रती लीटर) 
दिल्ली 69.97
कोलकाता 72.72
मुंबई 77.87
चेन्नई 72.53
- या महिन्यात 1 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या दरात 35 पैसे वाढ झाली आहे.

 

डिझेलचे दरानेही गेल्या वर्षीच्या तुलनेत उच्चांक गाठला 
20 एप्रिल 2018 रोजी डिझेलचे दर 


शहर  डिझेल (रुपये प्रती लीटर) 
दिल्ली 65.31
कोलकाता 68.01
मुंबई 69.54
चेन्नई 68.90

बातम्या आणखी आहेत...