आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद-तारा असलेल्या हिरव्या झेंड्यावर बंदी घालण्यासाठी याचिका; कोर्टाने केंद्राकडून उत्तर मागितले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी चांद-तारा असलेल्या हिरव्या झेंड्यावर बंदी आणण्यासंबंधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. हा झेंडा इस्लामी नसल्याचे म्हणत यावर केंद्राने बंदी आणावी. कोणत्याही धार्मिक स्थळावर अशा झेंड्याची गरज नसून त्याचा इस्लामशी संबंध नाही, असे याचिकेत नमूद आहे. न्यायमूर्ती ए.के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने याचिकेवर सुनावणी केली. 


शिया बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी याचिकेची सत्यप्रत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना द्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले. केंद्राकडून उत्तरही मागवले. याचिकाकर्त्यांनुसार, अशा झेंड्याचा इस्लाममध्ये कोठेही उल्लेख नाही. तो धर्माचे प्रतीक नसून शत्रुराष्ट्र असलेल्या पाकचे प्रतीक आहे. मुस्लिमबहुल भागात हिंसेसाठी असे झेंडे कारणीभूत असून यावर बंदीची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...