आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी पळ्हाटी जाळून धरित्रीचे नुकसान करु नये, ती शेतात मिसळून उत्पादन क्षमता वाढेल - मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी कृषि उन्नत मेळाव्याचे शनिवारी दिल्लीत उद्घाटन केले. - Divya Marathi
मोदींनी कृषि उन्नत मेळाव्याचे शनिवारी दिल्लीत उद्घाटन केले.

नवी दिल्ली -  शेतकऱ्यांनी पळ्हाटी जाळून भू-मातेचे नुकसान करु नये. त्याऐवजी ती पळ्हाटी शेतात मिसळली पाहिजे. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. भारतीय कृषि संस्थान, आयएआरआय पूसा येथे आयोजित कृषि उन्नत मेळाव्यात मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पुनरुच्चार केला. यावेळी मोदींच्या हस्ते 'कृषि कर्मण' आणि 'पंडित दीन द्ययाल उपाध्याय कृषी विज्ञान प्रोत्साहन' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

 

शेतकऱ्यांनी देशाची गरज लक्षात घेतली - मोदी 
- मोदी म्हणाले, 'देशाला जेव्हा गरज होती तेव्हा शेतकरी पुढे आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले होते, हे आपल्याला विसरता येणार नाही.'
- आज देशातील शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांचे आयुष्य सुखकर करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. 
- यूरियाच्या निम कोटिंगमुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पीक विमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारा परतावा दुप्पट झाला आहे. 
- पंतप्रधान सिंचन योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना टीओपी (टॉमॅटो, ओनियन, पोटॅटो) उत्पादनासाठी सरकार मदत करत आहे.

बातम्या आणखी आहेत...