आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • राजकीय नेत्यांची ईद Politician Eid Wishes Photo Story

नकवींच्या घरी ईद साजरी करण्यासाठी राजनाथ, डोभाल; गृहमंत्री म्हणाले- सीजफायरवर उद्या बोलू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नकवींना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह पोहोचले. - Divya Marathi
नकवींना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह पोहोचले.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींच्या निवासस्थानी शनिवारी ईदचा उत्साह होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, चित्रपट निर्माता मधुर भांडारकरसह अनेक दिग्गज उपस्थित होते. माध्यमांनी शस्त्रसंधीबद्दल राजनाथ यांना विचारले असता ते म्हणाले, 'त्यावर उद्या (रविवार) बोलणार  आहे.' मुख्तार अब्बास नकवींनी दिल्लीतील पंजा शरीफ दर्गा येथे नमाज पठण केल. त्यांनी ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 'आशा आहे की ही ईद देशात शांतता आणि बंधुभावाचा संदेश घेऊन येईल.' 

 

संसद मार्गावरील मशिदीत गुलाम नबी आझाद 
- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी येथील संसद मार्ग मशिदीत नमाज पठण केले. 
- यावेळी आझाद म्हणाले, 'काश्मीरमध्ये शांतता नांदावी हेच माझे मागणे आहे.'

- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील गांधी म्युनिसिपल स्टेडियम येथे जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी येथे नमजाही अदा केली. 
- मणिपूरमध्ये पुरस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील पुरस्थिीच्या पार्श्वभूमीमुळे राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी ईद साजरी करणार नसल्याचे म्हटले आहे. 

 

मध्यप्रदेशात दोन विरोधक एका मंचावर 
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे ईदच्या निमित्ताने एका मंचावर आले. भोपाळ येथील ताजुल मशिदीत येऊन दोन्ही नेत्यांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हटले. 
- मध्यप्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या नेत्यांनी साजरी केली ईद... 

बातम्या आणखी आहेत...