आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 लाख कर्मचाऱ्यांचा रेल्वे हेल्थ डेटाबेस तयार करणार; व्यसनी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वेकडून १४ लाख कर्मचाऱ्यांचा संपूर्ण हेल्थ डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या डेटातून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची क्षमता आणि त्यांची अावड पाहून नव्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. मनुष्यबळाच्या दृष्टीने भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी संस्था आहे. मागील काही काळापासून रेल्वेत नवे प्रशासकीय व तांत्रिक बदल अनुभवण्यास येत आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशावरून रेल्वे बोर्डाने या योजनेस मंजुरी दिली आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ लाख कर्मचाऱ्यांची सगळी माहिती नोंदली जाणार आहे. त्यांना असलेले आजार, यापूर्वी करण्यात आलेले उपचार याची माहिती गोळा केली जाणार आहे. जर कर्मचारी आजारग्रस्त असेल तर त्याच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार होतील.  मानसिक आजार असेल तर त्याच्या मानसिक अवस्थेची माहिती घेतली जाईल.  वैद्यकीय तपासणीत तो व्यसनी आहे का, याचाही शोध घेण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येईल.  

 

डेटाबेसमध्ये असेल आजाराची माहिती  
कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेला जगातील सर्वश्रेष्ठ संस्था करण्यासाठी मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे. उत्तम उपचार आणि समुपदेशनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा दिसून येईल. साहजिकच रेल्वेच्या सेवेतही फरक दिसून येईल.  


कर्मचाऱ्यांसाठी सुधारणा 

काम करताना कर्मचारी आनंदी दिसावेत यासाठी विभागीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केेल्या जातील. यामुळे कर्मचाऱ्यांत उत्साह टिकून राहील. त्यांना कामाचा कंटाळा येणार नाही.  

 

 

कामासाठी रेल्वे कर्मचारी आनंदी असणे गरजेचे  

चांगली कामगिरी होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असणे अावश्यक आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर उत्तम उपचार देण्याची सोय असेल.  रेल्वेची कामगिरी चांगली असण्यासाठी कर्मचारी आनंदात असणे आवश्यक आहे.
- अश्विनी लोहानी, अध्यक्ष, रेल्वे बोर्ड

बातम्या आणखी आहेत...