आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रिन्सिपलची हत्या, विद्यार्थी म्हणाला- माहित नाही किती गोळ्या झाडल्या, फक्त ट्रिगर दाबत राहिलो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी 12 वी क्लासमधील विद्यार्थी आहे. शनिवारी त्याने स्कूलमध्ये त्याच्या प्रिन्सिपलला चार गोळ्या घालून हत्या केली. - Divya Marathi
आरोपी 12 वी क्लासमधील विद्यार्थी आहे. शनिवारी त्याने स्कूलमध्ये त्याच्या प्रिन्सिपलला चार गोळ्या घालून हत्या केली.

यमुनानगर- स्वामी विवेकानंद स्कूलच्या 12 वीतील विद्यार्थ्याने महिला प्रिन्सिपलला गोळी मारली. जखमी प्रिन्सिपलची उपचारादरम्यान 2 तासानी तिचा मृत्यू झाला. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतरप आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी शिवांश गुंबरने सांगितले की, मला कळाले नाही की मी किती गोळ्या झाडल्या, मी फक्त ट्रिगर दाबात राहिलो. आरोपीने सांगितले हत्येचे कारण....

 

- हत्येचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, स्कूलमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून टॉर्चर करत होती. पापाने बुलेट घेऊन दिली होती त्यामुळे मी स्कूलमध्ये त्यावरच येत होतो.

- प्रिन्सिपल उलटे-सुटले बोलायची. धमकी द्यायची की, बोर्डाच्या परीक्षेसाठी रोल नंबर देणार नाही. क्लास अटेंड न केल्याने तिने हा इशारा दिला होता.

- भीती होती की, मीटिंगमध्ये प्रिन्सिपल माझ्या आई-वडिलांकडे तक्रार करेल. त्यामुळे संतप्त होऊन प्रिन्सिपलची हत्या करण्याचा विचार केला.

 

आठवड्यापूर्वी प्रिन्सिपलने फटकारले होते.....

 

- दुसरीकडे, प्रिन्सिपल रीतू छाब्राच्या हत्येच्या घटनेनंतर समोर आले की, हत्येचा आरोपी विद्यार्थी शिवांशच्या पित्याने बुलेट बाईक घेऊन दिली होत.

- तो नेहमीच बुलेटवर स्कूलमध्ये जायचा. शाळेच्या परिसरात बिनकामाच्या चक्कर मारत राहयचा. याचमुळे प्रिन्सिपलने त्याला फटकारले होते.

 

टीचर्सनी अनेकदा केली होती तक्रार-

 

- टीचर्सचे म्हणणे आहे की, अनेकदा आम्ही त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली होती. मात्र, कदाचित कुटुंबियाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. शनिवारी सुद्धा शिवांश घरातून बुलेट बाईकवर निघाला होता.

- पोलिसांना चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की,  त्याने बुलेट एमएलएन कॉलेजजवळ उभी केली होती. तेथून तो पायाने स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये गेला. संधी मिळताच तो स्कूलमध्ये गेला थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन धडाधड गोळ्या झाडल्या.

 

17 वर्षापासून स्कूलमध्ये टीचर, दोन वर्षापूर्वी प्रिन्सिपल बनली होती रितू

 

- प्रिन्सिपल रीतू छाब्रा 17 वर्षे या स्कूलमध्ये टीचर होती. दोन वर्षापूर्वी ती या विभागात ती प्रिन्सिपाल बनली होती.

- आरोपी 12 वी कॉमर्ससह इकॉनोमिक्सचा विद्यार्थी होता. प्रिन्सिपल रीतू इकॉनमिक्स शिकवायची.

- तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा कोलकात्यात जॉब करतो आणि छोटा रोहिन कुरुक्षेत्रमध्ये एनआयटीमधून इंजिनियरिंग करत आहे.

- पती राजेश छाब्रा चाऊमीन सप्लाय करतात. कोलकात्याहून मोठा मुलगा रितेश आल्यानंतर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आई प्रोमिलाचे म्हणणे आहे की, रितू गर्व्हनमेंट कॉलेज लुधियानातून शिकली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती....

बातम्या आणखी आहेत...