आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक स्वच्छतागृहांना आता यूआयडी क्रमांक मिळणार; शहरी भागात देखरेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती हा देशात नेहमीच थट्टेचा विषय राहिला आहे. परंतु आता शहरातील स्वच्छतागृहांचे रुपडे पालटणार आहे. कारण प्रत्येक स्वच्छतागृहांना यूआयडी दिला जाणार आहे. त्यामाध्यमातून त्याच्या स्थितीवर बारकाईने निगराणी ठेवली जाईल.


स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने सार्वजनिक स्वच्छतागृहांवर बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले आहे. स्वच्छतागृह कोणत्या समितीच्या अंतर्गत येते, देखभाल-दुरुस्ती करणारी यंत्रणा कोणती ? त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असलेली माहिती या क्रमांकाशी जोडलेली असेल. त्यामुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होणार नाही. सामान्य नागरिकास काही अडचण जाणवल्यास किंवा तक्रार असल्यास ते क्रमांकावर संपर्क करू शकतील. ही माहिती स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारावर लावलेली असेल. केंद्रा ने स्वच्छतागृहांबाबत देशातील ४ हजार ३०२ शहरांतील पालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. लोकांना हव्या असलेल्या स्वच्छतागृहाची तपशीलवार माहिती देण्यात आडकाठी येता कामा नये, असे पत्रातून बजावण्यात आले आहे. देशात उघड्यावरील शौच मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे एक अभियान आहे, असे पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...