आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिन सोहळा; राहुल गांधींना चौथ्या रांगेत जागा; कॉग्रेसची सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसण्याची जागा देण्यात आली आहे. तथापि, या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजाेरा देण्यात आलेला नाही. याबाबत काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले की, या आधी काँग्रेस सत्तेत असो किंवा नाही, काँग्रेस अध्यक्षांना नेहमीच पहिल्या रांगेत जागा मिळत राहिलेली आहे. मात्र, यंदा असे होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सोहळ्यात आले तर त्यांना चौथ्या रांगेत बसावे लागेल. बैठकीची व्यवस्था कुठेही केली तरी राहुल हे सोहळ्यात सहभागी होणारच, असेही या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. असा कोतेपणा करून मोदी सरकार अत्यंत गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे, आणखी एक काँग्रेस नेते म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाचा अपमान करणे हाय यामागीत हेतू आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पहिल्या रांगेत जागा मिळत असेल तर राहुल गांधी यांना का नाही? असा सवालही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...